EbixCash ने मिळवले नॉर्थ बेंगाल स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे दीर्घ कालावधीसाठीचे बस एक्स्चेंज कंत्राट
- by Reporter
- Oct 01, 2022
- 294 views
नॉयडा व जोहन्स क्रीक –विमा, वित्तीय सेवा, आरोग्यसेवा आणि ई-लर्निंग उद्योगक्षेत्रांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑन-डिमांड सॉफ्टवेअर आणि ई-कॉमर्स सेवा पुरविणारी अग्रगण्य कंपनी Ebix, Inc. (NASDAQ :EBIX)ची उपकंपनी असलेल्या EbixCashने नॉर्थ बेंगाल स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (NBSTC)द्वारे चालविल्या जाणा-या राज्य परिवाहनाच्या सर्व बसेसच्या रचना, विकास, बांधणी, मांडणी, व्यवस्थापन, कार्यान्वयनाचे तसेच त्यांना इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) हस्तांतरीत करण्याचे प्रतिष्ठेचे कंत्राट बहाल करण्यात आल्याचे कंपनीने आज घोषित केले.
कलकत्ता स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (सीएसटीसी), पश्चिम बेंगाल ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (डब्ल्यूबीएसटीसी) आणि दक्षिण बेंगाल स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एसबीएसटीसी)या पश्चिम बंगाल राज्यातील तीन महत्त्वाच्या वाहतुक संस्थांशी याआधीच केलेल्या तीन करारांमध्ये आता या नव्या कराराची भर पडली आहे. या चार कंत्राटां पैकी प्रत्येक कंत्राटाची प्रारंभिक मुदत ७ वर्षांची असणार आहे. या नव्या कंत्राटामुळे पश्चिम बंगाल राज्यामध्ये EbixCash बस एक्स्चेंज सोल्यूशन्स बसविल्या जाणा-या बसेसची एकूण संख्या २,८००वर पोहोचली आहे.
EbixCashला आंध्र प्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एपीएसआरटीसी)द्वारे आंध्र प्रदेश राज्यामध्ये चालविल्या जाणा-या किमान १४,९५० बसेसच्या विकास, उभारणी मांडणी, व्यवस्थापन, का-यान्वयन आणि इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस)च्या हस्तांतरणाचे ५ वर्षांसाठीचे कंत्राट मिळाल्याचे कंपनीने २२ मार्च २०२२ रोजी जाहीर केले होते.
EbixCash चा बस एक्स्चेंज विभाग हा भारतातील बस तिकीट यंत्रणेच्या ३० टक्के भागात कार्यरत व वर्षाकाठी $१.७ बिलियन्सचे व्यवहार करणा-या एंटरप्राइज बस ई-कॉमर्स हाताळणीच्या क्षेत्रातील भारतातील एक प्रभावशाली आघाडीचा विभाग आहे, ज्याच्या क्लाएंट्समध्ये १४ हून अधिक मोठ्या राज्यांच्या मालकीच्या सार्वजनिक वाहतूक महामंडळांचा समावेश आहे.
EbixCash ची इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएल) इलेक्ट्रॉनिक टिकेटिंग मशिन्स आणि सॉफ्टवेअरसह फेअर टिकेटिंग आणि कलेक्शनच्या सर्व पाय-या स्वयंचलित करण्यासाठी काम करते. यामुळे दोन्ही कॉर्पोरेशन्सद्वारे चालविल्या जाणा-या सर्व बसेसमधील मनुष्यबळाचा इष्टतम वापर करण्याच्या प्रयत्नांबरोबरच महसूल गळती थांबवणे, प्रत्यक्ष प्रवाशांना वेगवान सेवा देणे, बसच्या मार्गावर चालणा-या आर्थिक व्यवहारांवर हरक्षणी संपूर्ण नियंत्रण राखणे, बसेसचा माग ठेवणे आणि व्यवहारांची लेखापरीक्षा, शिस्तशीर MIS आणि हरक्षणी मिळणारा डेटा यांच्या संदर्भातही बस कॉर्पोरेशन्सना प्रचंड सकारात्मक बळ मिळते. प्रत्यक्ष प्रवाशांना रांगेमध्ये उभे राहण्यात आपला वेळ वाया घालवावा लागत नाही, व बसबाहेर आणि बसच्या आतही तिकीट काढण्यासाठी स्मार्ट कार्डसचा वापर करता येतो.
EbixCashच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष रॉबिन रैना म्हणाले, “या विजयामुळे आम्ही आनंदी झालो आहोत, कारण त्यामुळे आज देशातील राज्यांच्या मालकीच्या बस-वाहतूकीच्या एक मोठ्या भागाला फेअर टिकेटिंग आणि कलेक्शन, इलेक्ट्रॉनिक टिकेटिंग मशीन्स आणि संबंधित सॉफ्टवेअरच्या सर्व यंत्रणा स्वयंचलित करण्याच्या संदर्भात EbixCash तंत्रज्ञानाचे बळ लाभत आहे ही बाब अधिकच ठळकपणे अधोरेखित झाली आहे. तंत्रज्ञानातील या क्षमतेची आमच्या पेमेंट सोल्यूशन कार्ड प्रोडक्ट्सबरोबर सांगड घालण्याचा आमचा प्रयत्न सतत सुरू असतो, जी प्रोडक्ट्स पंतप्रधान मोदींच्या वन कंट्री वन कार्डच्या स्वप्नाबरहुकुम बसवाहतुकीसह आयुष्याच्या सर्वच बाजूंमध्ये वापरता येऊ शकतील”
रिपोर्टर