
तळोजा सेक्टर १८/१९ मध्ये रस्त्याचे दुरावस्था रस्ता दुरुस्त करा सवन गोयल यांची मागणी!
नवी मुंबई : तळोजा सेक्टर १८/१९ मध्ये रोडची दुरुस्त झाली असून संपूर्ण रोड खराब अवस्थेमध्ये असल्याचे चित्र दिसत आहे या रोडवर वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी असून रोडचे काम व्यवस्थित न झाल्या-कारणाने रोड वरती खड्डेच खड्डे निर्माण झालेले आहेत त्यामुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहेत परिणामी कितीतरी दुचाकी स्वरांना या रस्त्यामुळे अपघाता समोर जावे लागले आहे त्यातून त्यांच्या शरीराला इजादेखील पोचलेली आहे मात्र तळोजा विभागातील संबंधित अधिकारी कोणत्याच प्रकारचे लक्ष देण्यास तयार नसल्याचा संताप सवन गोयल यांनी व्यक्त केलेला आहे
दरम्यान सध्या पावसाचा मोसम सुरू असल्याकारणाने रोड वरती पडलेल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यामुळे पाणी साचलेले असते वाहन चालकांना रोडवरील खड्ड्यात पाणी असल्याकारणाने वाहन चालवताना अंदाज येत नाही त्यामुळे दररोज या खड्ड्यांचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत तळोजा सेक्टर १८ व सेक्टर १९ या रोडवर कोणत्यातरी वाहन चालकाला आपला जीव गमावा लागला किंवा जीव गेल्यास जाग येणार आहे का ? असा संताप जनक सवाल देखील सवन गोयल यांनी व्यक्त केलेला आहे
याबाबत तळोजा विभागातील स्थानिक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की हा रस्ता मृत्यूचा सापळ्यासारखाच झालेला आहे कधीकाळी या रस्त्यावर मोठी दुर्घटना होऊन वाहन चालकाचा जीवदेखील धोक्यात येऊ शकतो किंवा जीव देखील जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे संभाव्य परिस्थिती लक्षात घेता तळोजा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेस लक्ष घालून वाहन चालकांच्या मृत्यूचे पाप डोक्यावरती घेऊ नये याकरिता या रोडची दुरुस्ती त्वरित करावी असे म्हणणे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केलेले आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम