मराठी भाषिक राज्यात पोट भरायला आलेल्या उपऱ्यांचा थयथयाट कशाला?दीपक शिरवडकर

मराठी माणसा विचार कर जरा मुबंई सह मराठी माणसास संपवण्याचा प्रयत्न उपऱ्या सुपारीबाजांचा चालला आहे. मराठी व्देष्ठयांच्या मागे मराठी माणूस जातोच कसा?टॉवर संस्कृतीला भुलू नका,चाळ सोडून मुंबईबाहेर जाऊ नका चाळ संस्कृतीच बरी संस्कृती-पंरपरा जपली जाते खरी!अन्य भाषिक राज्यात राजकारण-समाजकारणात मराठी माणूस किती टक्का आहे याचा विचार करा.मराठी राज्यात उपऱ्यांचा भपका हवा कशाला मुंबईसह महाराष्ट्र सर्व क्षेत्रात आहे अग्रेसर उपऱ्यांची आहे तिच पोटदुखी!सत्तापिपासू मराठी माणूस उपऱ्यांचे झालेत घरगडी मुंबईतील सरकारी संस्थांचे होतेय खासगीकरण आणि ऑथॉरीटीकरण,जाती-धर्मात व्देष निर्माण करून आरक्षणाच्या नावाखाली भडकवली जात आहेत तरुणांची माथी एकिकडे खासगीकरणाचे नारे,सरकारी क्षेत्रात मग कोठून वाहणार नोकरीचे वारे!सर्वच क्षेत्रांचा बोजवारा.

मुंबईसह मराठी माणसाच्या जीवावर मोठे झालेल्या मानमरातब मिळविणाऱ्यां उपऱ्यांच्या खोटया थयथयाटाला मराठी माणसा बळी पडू नको.मुंबई मराठी माणसाच्या,भुमिपुत्राच्या बापाची आहे, पोट भरायला मुंबईत आलेल्या उपऱ्यांची नाही आणि उपऱ्यांना साथ देणाऱ्या फंदाफितुरांची नाही.अन्य राज्यात मराठी भाषिकांना सत्तेत दिला जात नाही वाटा,मग महाराष्ट्रात अमराठीचे लाड कशाला?गोड बोलून करीत मराठी माणसाची केली जाते फसवणूक जात-धर्म-देव-मंदिर-भोंगे-चालीसा ,आरत्या हिंदुत्व अशा भावनिकतेचे आवाहन करत भडकवली जातात डोकी,अन्न-वस्त्र-निवारा-बेकारी-महागाई-शिक्षण-सुरक्षा-नागरी सुविधा वाहतूक यावर मात्र कोणीच बोलत नाही. राज्यात अशांतता पसरवून मराठी भाषिकांना व मराठी भाषिक राज्याला संपविण्याचा छुपा अजेंडा तर राबविला जात नाहीना?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या नावाची कावीळ का?विचारांची लढाई विचारानेच लढायची असते.खोटा इतिहास सारखा सांगून काहीही साध्य करता येत नाही. मराठा क्रांती मोर्चा,मागासवर्गीय मुस्लिम समाज शहाणा होत आहे ही जमेची बाजू आहे मराठयांनी अटकेपार झेंडा लावला आहे हे कोणीही विसरू नये.मुंबई तुमची भाडी घासा आमची म्हणणारे मराठी भाषेचा व्देष करणारे यांची संगत नको रे बाप्पा!


                            

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट