
सबऑर्डीनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे अभियंते २९ ऑगस्ट रोजी करणार प्रकाशगडावर आंदोलन संजय ठाकूर यांनी दिला महावितरणाला इशारा!
नवीमुंबई : सातारा येथे दि २० व २१ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या संघटनेच्या केंद्रिय कार्यकारिणीच्या बैठकीत महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारा विरोधात महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत या भावनांचा विचार करून असोसिएशनच्या वतीने सब ऑर्डिनेट इंजिनीअर्स 29 ऑगस्ट रोजी प्रकाश गडावर तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव संजय ठाकूर यांनी दिली आहे
संजय ठाकूर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रिका मध्ये असे म्हटले आहे की मागील अनेक दिवसापासून पदोन्नती पॅनल होऊनही उशिरा ऑर्डर काढणं,पदोन्नती अभियंताना पदस्थापना देताना परिपत्रक न ५१४ च सत्यताने होणारे उल्लंघन त्यामुळे अभियंतांमध्ये असंतोष पसरला होता. त्याचबरोबर मानव संसाधन विभागामध्ये विविध स्तरावरच्या प्रकरणे वर्षांनी वर्षे प्रलंबित असल्याने दिवस-रात्र कंपनीसाठी काम करणाऱ्या अभियंतांमध्ये महावितरण कंपनीच्या बाबतीत प्रचंड असंतोष पसरला होता. नुकत्याच झालेल्या कनिष्ठ अभियंता ते सहाय्यक अभियंता पदोन्नती पॅनल मध्ये पोस्टिंग देताना महावितरण प्रशासनने जाणूनबुजून परिपत्रकाचे उल्लंघन करून अनेक अभियत्यांना प्रादेशिक विभागाबाहेर पोस्टिंग देण्यामध्ये प्रशासनाने धन्यता मानली असल्याचा आरोप संजय ठाकूर यांनी महावितरण विरोधात केला आहे.
दरम्यान : या अन्यायकारक गोष्टींचा निषेध म्हणून दिनांक २९ ऑगस्ट२०२२ रोजी प्रकाशगडा समोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतलेला आहे महाराष्ट्रातील तीनही कंपनीचे सर्व प्रादेशिक पदाधिकारी, राज्य समन्वयक, सहसचिव व मंडळ कार्यकारिणीचे सदस्य सामील होणार आहेत. त्याच वेळी राज्यातील इतर सभासद काळ्याफिती लावून सदर बाबतीत निषेध नोंदवणार आहेत. एवढे करूनही प्रशासन कारभार सुधारला नाही तर गणपती उत्सवानंतर प्रदीर्घ आंदोलन छेडण्याचा निर्धार देखिल संघटनेच्या वतीने सरचिटणीस संजय ठाकूर यांनी व्यक्त केला आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम