तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहा लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

नवी मुंबई : तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुमारे दहा लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करून यामध्ये तळोजा फेज-१ येथून दोन जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासीत अली सय्यद यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, तळोजा फेज-१ येथील अमर रेसिडेन्सी, शॉप नंबर ३, प्लॉट नं. २१, सेक्टर ९ येथील गाळ्यामध्ये निरनिराळया कंपनीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखु व सुगंधी सुपारीचा साठा विक्री करण्याकरीता ठेवलेला आहे. त्या ठिकाणी दोन पंचासमक्ष छापा मारून, आरोपी महमद हमजा महमद शाहिद खान, (वय २६ वर्षे) आणि अरफान सिराज अहमद शेख (वय २२ वर्ष) यांच्याकडून ८,९३,७३० /- रू किंमतीचा वेगवेगळया कंपनीचा प्रतीबंधीत पानमसाला व सुगंधीत तंबाखु व रोख रक्कम १,२६,२००/-रू. असा एकुण १०,१९,९३० /- रूपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. दोघेही सेक्टर-१० मधील एनक्लेव्ह बिल्डींगमध्ये राहत असून त्यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित पोस्ट