शहापूर तालुका काँग्रेस तर्फे वाशिंद ते शहापूर आझादी गौरव पदयात्रा संपन्न

शहापूर : ठाणे जिल्हा ग्रामीण कमिटी तर्फे जिल्ह्यात 75 किलोमीटर आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून आज शहापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेश धानके मार्गदर्शनाखाली वासिंद ते शहापूर आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन ठाणे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली  करण्यात आले होते,या पद यात्रे दरम्यान पर्यावरण काँग्रेस मार्फत 75 वृक्षांची लागवड करण्यात आली  वासींद येथून सुरू झालेल्या आझादी गौरव पदयात्रेचा समारोप पंचायत समिती हुतात्मा स्मारक येथे करण्यात आला

या पदयात्रेला ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, माजी खासदार सुरेश टावरे, प्रभारी सुभाष कानडे, पर्यावरण प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक, युवक काँग्रेसचे प्रदेश  सरचिटणीस विरेन चोरघे, शहापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश धानके, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण घरत, अफिफ शेख, परशुराम पितांबरे, जिल्हा सरचिटणीस रवींद्र परटोले, पंकज गायकवाड, पर्यावरण काँग्रेसचे रामचंद्र जोशी, इंटकचे जिल्हाध्यक्ष पंढरी भोईर, महिला जिल्हाध्यक्ष संघजा मेश्राम, महिला तालुकाध्यक्ष संध्या पाटेकर, शहापूर युवक अध्यक्ष अंकुश भोईर, कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे, भिवंडी तालुका अध्यक्ष राकेश पाटील, मल्हारी कोळेकर, सूर्यकांत भोईर, बुधाजी मांजे, शहापूर शहर अध्यक्ष संजय तांबोळी, जयदीप देशमुख, पर्यावरण तालुका अध्यक्ष महेंद्र आरज, जान्हवी देशमुख, संतोष मुकणे, कांता तारमाले, दशरथ तारमाले, लक्ष्मण निचिते, तानाजी भगत, वसंत तारमले,  शैलेश राऊत, कसारा शहर अध्यक्ष दिलीप पंडित, वासिंदचे अध्यक्ष शांताराम धामणे, ओबीसी तालुका अध्यक्ष प्रमोद निमसे, भिवंडी सोशल मीडियाचे बाळा हूकमाली, जयवंत पाटेकर, भिवंडी ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश वखारे, शहापूर शहर महिला अध्यक्ष सुवर्णा भोये, महिला मीडिया अध्यक्षा धनश्री पठारी, नौशाद शेख तसेच शहापूर तालुक्यातील जिल्हा, तालुका पदाधिकारी, महिला, युवक, सेवादल, सर्व फ्रंटल, सेल, विभागाचे प्रदेश, जिल्हा, तालुका पदाधिकारी, शहर अध्यक्ष, मंडल प्रमुख आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित पोस्ट