
प्रशिक्षण न घेता अग्निशामक दलात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करा ! लक्ष फाउंडेशनची मागणी !
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलात सेवा देत असताना त्या अगोदर प्रशिक्षित प्रमाणपत्र असणे गरजेचे असताना नवी मुंबई महानगरपालिकेने तशा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची निवड न करता कर्मचारी भरती केल्याचे उघडीस आलेले आहे
याबाबत नवी मुंबई शहरात कार्यरत असणाऱ्या लक्ष फाउंडेशन ने अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांची तात्काळ सेवा समाप्ती करावी अशी मागणी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे
दरम्यान देशभरामध्ये नवी मुंबई महानगर पालिकेने सर्व उत्कृष्ट असे नामांकन पुरस्कार प्राप्त केले आहेत त्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात वेळप्रसंगी नागरिकांचा संरक्षणाची व जीव वाचवण्यासाठी जी अग्निशमन दल यंत्रणा कार्यरत आहे त्या यंत्रणेच्या कर्मचाऱ्याकडे प्रशिक्षित प्रमाणपत्र नसल्याने ही दुर्दैवाची बाब आहे हे कर्मचारी एखाद्या दुर्घटनेमध्ये नागरिकांचे कसे काय? आणि कसे प्राण वाचवतील? हा प्रश्न उभा आहे म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने अशा अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या वरती कारवाई करून त्यांची सेवा समाप्त करावी अशी मागणी लक्ष फाउंडेशन च्या रेणुका गायकवाड महाले यांनी महानगरपालिका आयुक्ताकडे केलेली आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम