स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची बेलापुर ते रत्नागिरी सायकल रॅलीचे आयोजन!. .

नवी मुंबईस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी कोकण रेल्वेच्या वतीने एक अभिनव कार्यक्रम राबून बेलापुर ते रत्नागिरी पर्यंत सायकल रॅली  चे आयोजन करण्यात आलेले आहे रॅलीतून कोकणतील स्वातंत्र्यसैनिकांनी क्रांतिवीरांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्या समर्थकांना मानवंदना देऊन ही रॅली सायकलवर स्वार झाली असून रत्नागिरी पर्यंत प्रवास करणार आहेत

दरम्यान: या सायकल रॅली ची सुरुवात बेलापूर मधून दिनांक ४/८/२०२२ तारखे पासून झाली असून या रॅलीची समाप्ती दिनांक ०८ /८/२०२२ रत्नागिरी या ठिकाणी होईल या रॅलीचा उद्देश भारतीय राष्ट्र ध्वजा या ध्वाजाचे महत्व आणि त्या संबंधित असलेली जागृतता नागरिकांना मोठ्या प्रमाणात समजून यावी म्हणून कोकण रेल्वेने या रॅलीचे आयोजन केले आहे.  रॅलीमध्ये डॉक्टर शिरीष मदार उपमुख्य चिकित्सा अधिकारी या रॅलीचे प्रमुख असून त्यांच्या सोबत प्रमोद कुमार सबोत, डी आर सावंत, शैलेंद्र शेटये, किशोर राऊत, श्री.जे सावनेर वैभव फनसलकर, भीमलाल भंडारी, मनोज साळुंखे, दीपक परब, अमोल कोटकर, या रेल्वे कर्मचाऱ्यांनी रॅलीत सभाग घेतला आहे.

संबंधित पोस्ट