मोदी सरकारच्या विरोधात नवी मुंबई काँग्रेस कमिटी तर्फे शांततापूर्ण सत्याग्रह !

नवीमुंबई :  केंद्रातील मोदी सरकार सुडबुध्दीने काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणा चा वापर करून नहक त्रास देत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीच्या वतीने नवी मुंबई वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बुधवारी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले

महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष  आमदार नानाभाऊ पटोले  यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई मध्ये या सत्याग्रह आंदोलनाची सुरुवात झाली  काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्यावर केंद्रातील भाजपचे मोदी सरकार राजकीय  सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप करून केंद्रीय तपास यंत्रणा (ईडी) चा वापर करत आहेत 


देशामध्ये महागाईने उच्चांक गाठला असून गोरगरीब जनता बेजर बेरोजगार झाल्याचे चित्र सध्या परिस्थिती दिसत असताना ही परिस्थिती लपविण्यासाठी मोदी सरकार आपले चुकीचे निर्णय धोरण झाकून ठेवण्यासाठी सर्वसामान्यांचे लक्ष विंचलीत करुन  काँग्रेस नेत्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. या साठीच  वाशी, येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी बुधवारी सकाळी ११ ते ३ या वेळेत शांततापूर्ण सत्यागृह चे आयोजन करण्यात आले होते. 


दरम्यान: सत्याग्रह आंदोलन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार श्री. नानाभाऊ पटोले  यांच्या आदेशानुसार नवी मुंबईतील  काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन सत्याग्रह आंदोलन यशस्वी केले यावेळी माजी मंत्री  श्री. नसिम खान  कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, श्री. वजाहत मिर्झा अल्पसंख्यांक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, 

श्री. प्रमोद मोरे  सरचिटणीस – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, श्रीमती संध्याताई सव्वालाखे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वात शांततापूर्व सत्यागृह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 


दरम्यान : सत्याग्रह आंदोलन यशस्वी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे श्री.  रामचंद्र ( आबा ) दळवी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, श्री. महेंद्र घरत, रायगड जिल्हा अध्यक्ष, श्री. अविनाश लाड, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री. रमाकांत म्हात्रे,  कार्यकारी सदस्य - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, श्री. आनंद ( बंटी ) सिंग सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सौ. सुदर्शना कौशिक,  श्री. संतोष शेठ्ठी, सौ. पुनम पाटील, श्री. अंकुश सोनावणे, सौ, मिरा पाटील, श्री. प्रशांत वाघ, अध्यक्ष – बेलापूर ब्लॉक, श्री. रविंद्र सावंत, अध्यक्ष – नेरूळ ब्लॉक, श्री. संजय कपूर, अध्यक्ष – सानपाडा ब्लॉक, श्री, सचिन नाईक, अध्यक्ष – वाशी ब्लॉक, श्री. बाबासाहेब गायकवाड, अध्यक्ष – तुर्भे  ब्लॉक, श्री.जयवंत निकम, अध्यक्ष – घणसोली ब्लॉक, श्री, राजू वानखेडे, अध्यक्ष – ऐरोली ब्लॉक, श्री. बालाजी साळवे, अध्यक्ष – दिघा तसेच सेल अध्यक्ष श्री. अन्वर हवलदार, श्री. राजेश भांबुरे, श्री. रत्नाकर कुदळे, श्री. रितेश तांडेल, श्री. शिताराम शिरसाट, श्री. अमित पाटील, श्रीमती. सिंधिया घोडके, राखी पाटील, सौ. अरती विचारे, सौ. संध्या कोकाटे,  श्री. संदेश बनसोडे, यूथ काँग्रेस अध्यक्ष – नवी मुंबई. श्री. नासीर हुसैन, श्री. अनिकेत अपूर्व इत्यादी काँग्रेस कमिटी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट