मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करा!ओबीसी नेते धनाजी सुरोसे यांची मागणी!..

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय राज्यघटनेचा अवमान केला असल्याचा आरोप करत ठाणे जिल्ह्यातील ओबीसी नेते धनाजी सुरोशे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये एका तक्रार अर्जाद्वारे  केलेली आहे

संपूर्ण भारत देशाचा कारभार  भारतीय संविधानानुसार चालत आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या कारभार देखील राज्यघटनेवर धर्मनिरपेक्ष कार्यप्रणाली, कारभार आधारित आहे त्याचाच भाग शासकीय कार्यालयात कोणतेही धार्मिक विधी कार्यक्रम करू नये असे वेळोवेळी शासनाने परिपत्रक काढलेले असताना देखील ७ जुलै २०२२ रोजी नवीन मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कारभार पाहण्यासाठी सुरुवात करताना शासकीय कार्यालय (मंत्रालयात) धार्मिक विधी करून महाराष्ट्र राज्याचा कारभार पाहण्यास सुरू केली हे कृत्य म्हणजे राज्यघटनेचा अवमान करणारे आहे हे सिद्ध होत आहे. महाराष्ट्र राज्य हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. कलम २५ ते ३० नुसार राज्य कारभार धर्मनिरपेक्षित पाहणे असे असताना  राज्यघटनेच्या विरुद्ध विधी कार्य करून धर्मांध एका विशिष्ट धर्माची ठेकेदारी दाखवण्याचे काम मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या कृत्याने भारतीय संविधानावर विश्वास ठेवून चालणाऱ्या सर्व नागरिकांच्या भावना दुखावण्याचा हेतू मनात ठेवुन हा कार्यक्रम पार पडला आहे.

या देशात कुठलाही राष्ट्रधर्म नाही हे भारतीय संविधान सांगत असताना


माझ्यासारख्या धर्मनिरपेक्ष कार्यकर्त्याला फार मोठे दुःख होत असल्याचे खंत धनाजी सुरोसे यांनी व्यक्त केली 

दरम्यान :घडलेला प्रकार ही मोठी शोकांतिका तसेच निंदनीय बाब आहे. कलम १६६ भादवि प्रमाणे  हा केलेला गुन्हाच आहे असा कायदा सांगतो म्हणून या गुन्ह्याची दखल घेऊन श्री.एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करा नाही तर कोर्टात सुद्धा याचिका दाखल केली जाईल असा इशारा देखील धनाजी सुरोसे यांनी दिलेला आहे.

संबंधित पोस्ट