यूपीएससी परीक्षेत शहापुरचा नीरज विजय पाटील चमकला

शहापूर : नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून शहापूर तालुक्यातील टहारपूर विद्यालयाचे शिक्षक विजय पाटील व साखरोली शाळेच्या शिक्षिका ललिता पाटील यांचा मुलगा व राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक स्व.लक्ष्मण शंकर घुडे (उंबरपाडा मुरबाड) यांचा नातू नीरज  पाटील याने ५६० रँक घेऊन यूपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.

सहा महिन्यांपूर्वी नीरज ने आरबीआयची परीक्षा देऊन क्लास वन ची नोकरी मिळवून नागपूर येथे व्यवस्थापक म्हणून काम करत आहे.ही नोकरी सांभाळून त्याने यूपीएससी परीक्षेत दाखवलेली चमक विशेष उल्लेखनीय आहे.


नीरज पाटील हा मूळ भिवंडी तालुक्यातील साई गाव अस्नोली येथील असून त्याचे आईवडील नोकरी निमित्त शहापूर मध्ये असल्याने तो रामबाग शहापूर येथे स्थायिक झाला.२०१७ मध्ये व्हीजेटीआय मधून त्याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली.त्यावेळीच त्याने युनिक  ऍकेडमी जॉईन करून तुकाराम जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली यूपीएससी चा अभ्यास सुरू केला,भूषण देशमुख यांचेही मार्गदर्शन मिळाले,आरबीआयची नोकरी लागण्याच्या आधी त्याने रोज दिवसातून ९ ते १० तास अभ्यास केल्याचे नीरजने प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.नीरज च्या या यशामुळे त्याचे व त्याचे आईवडील श्री.व सौ. पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित पोस्ट