शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव का घेता? असं विचारणार्यांना अद्याप महाराष्ट्र समजला नाही ! - शरद पवार
- by Reporter
- Apr 23, 2022
- 446 views
कोल्हापूर दि,२३ (मंगेश फदाले) शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव का घेता?असं विचारणार्यांना अद्याप महाराष्ट्र समजला नाही असं बोलून शरद पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला !
छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्या अंत:करणात आहेत"! असं वक्तव्य करून शरद पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची बोलती बंद केली!
शिवरायांचे राज्य रयतेचे राज्य होते ! शिवरायांचे राज्य भोसल्यांचे राज्य नव्हते
असं बोलून राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्या टिकेला सडेतोड उत्तर शरद पवार यांनी दिलं ! कोल्हापूर मधील राष्ट्रवादीच्या संकल्प सभेत ते बोलत होते !
दिल्लीत काही चुकीचं घडलं तर त्याचा संदेश जगभर, देश अस्थिर असल्याचा नकारात्मक संदेश जातो ! मग दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केंद्रात असलेल्या भाजपाच्या गृह खात्याची नाही का असा सवाल शरद पवार यांनी केला!
कर्नाटकच्या सत्ताधारी पक्षाकडून अल्पसंख्यांक समाजाच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊ नये यासाठी आंदोलन चालवलं जातंय !
काश्मीर फाईल मधून जातीय संघर्ष दाखवला पण ती घटना घडली तेव्हा सरकार कुणाचं होते ? त्यांनीच हया विषयावरील तणाव मध्यन्तरी वाढवला !
जातीय संघर्ष वाढवून मतांचा जोगवा मागायचा हि भाजपाची जुनी सवय आहे
कोल्हापूर विधानसभा पोट निवडणुकीचा निकाल हा महाराष्ट्राला एक सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे ! असं पवार यांनी तपोवन भूमीत आवर्जून नमूद केलं !
गुजरात मध्येच इतर राष्ट्राचे प्रमुख येतात! असे का? इतर राज्यात का नाही जात? असा सवाल केंद्रातल्या भाजपा सरकारला शरद पवार यांनी केला!
सत्ता जाते आणि सत्ता येते,सत्तेचा माज नसावा आणि सत्ता डोक्यात जाता कामा नये
दिल्लीत बसलेल्या भाजपा सरकार कडून सत्तेचा गैरवापर होतोय ! असं टीकास्त्र पवार यांनी केंद्रातल्या भाजपा सरकार वर सोडलं!
शाहू महाराजांचा इतिहासातील एक किस्सा सांगून 'भविष्याच्या दुकानावर' पोळ्या भाजणाऱ्यांना शरद पवार यांनी चांगली चपराक लगावली !
कोल्हापूर नगरीतील तपोवन मैदानात राष्ट्रवादीच्या संकल्प सभेला राष्ट्रवादीचे राज्यातील अनेक महत्वाचे नेते, लाखोंच्या संख्येने सामान्य जनता आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते !
रिपोर्टर