नाचून नाही, वाचून महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक - अॅड. प्रज्ञेश सोनावणे

ठाणे (प्रतिनिधी) :बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी २०२२, आनंद नगर कोपरी ठाणे पूर्व, येथे ११ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ०७:३० वाजता, स्त्री शिक्षणाचे जनक, महात्मा जोतीराव फुले यांची १९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले होते. याप्रसंगी ठाण्यातील अॅड. प्रज्ञेश सोनावणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, फुले आंबेडकर हे ह्या देशातील एक नंबरचे नेते आहेत. त्यांना फक्त जाती मध्ये बंदिस्त करून आपण त्यांचे कार्य कुठे तरी कमी करत आहोत. ही चिंता व्यक्त केली. त्यांचे विचार आपल्या आचरणात आणले पाहिजे.

महात्मा जोतिराव फुले यांनी देशामध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पुण्यामध्ये साजरी केली. लोकांना मार्गदर्शन करताना, पुढे अॅड. सोनावणे यांनी अधिक माहिती दिली की, नाशिक पंचवटी येथे महात्मा फुले यांचा देशातील पहिला पुतळा १९५१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते उदघाटन झाले. 

गुरू शिष्यची परंपरा कशी असली पाहिजे तर फुले आंबेडकर हे देशासमोर आदर्श आहेत.

महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांना शेती कशी करायची त्यासाठी नमुने तयार केलेले होते.

त्याचबरोबर फुले म्हणाले होते की, घरातील पुरुष शिकला की तो स्वतः पुरतं शिकतो, परंतु कुटुंबातील स्त्री शिकली ती पूर्ण घराला शिक्षित करते. तोच विचार आपण आपल्या घरापासून सुरुवात केला पाहिजे.

फुले-आंबेडकर विचारांना जोडणारा दुवा म्हणजेच छत्रपती शाहू महाराज होय. छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने सत्यशोधक विचारांचे होते. आरक्षणाची तरतूद स्वतःच्या राज्यापासून अमलात आणणारे पहिले महापुरुष होय. तात्कालिन कर्मठ व्यवस्थेविरुद्ध लढणारे राजर्षी शाहू महाराज आहेत.

आजच्या तरुणांनी आपला वेळ वाचनाकडे दिला पाहिजे, महापुरुषांचे विचार वाचले पाहिजे आणि ते आत्मसात केले पाहिजे.  सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वप्निल सरदार होते. तर आभार प्रदर्शन शिल्पा साळवे यांनी मानले. तसेच नितिन दुधसागर, रत्नदिप जानराव, अक्षय लोंढे, अविनाश गायकवाड, प्रविण गायकवाड, रविंद्र बच्छाव, शाम जाधव, डॉ. विष्णू सिरसाट, दीक्षा साळवे, हेमंत वायनकर इत्यादी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.

संबंधित पोस्ट