माजी तहसीलदार बि के गायकवाड लिखित वेदनेच्या वाटेवरून आत्मचरित्र प्रकाशन सोहळा संपन्न!..

नवी मुंबई (प्रतिनिधी) संपूर्ण आयुष्यामध्ये माणसं समाजसेवेसाठी जगण्यासाठी व इतरांचे दुःख झेलण्यासाठी कधीकाळी अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालत असतात त्यानंतर  आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा शोध  सुरू होत असतो! तो प्रवास कधीकाळी वेदनादायक तर कधीकाळी आनंददायी असू शकतो !

 काही लोक जीवनामध्ये स्वतःच्या वेदनेला सामोरे जातातच व इतरांच्या वेदना समजून घेण्यासाठी आपले आयुष्य ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतात त्या-त्या क्षेत्रामध्ये खर्ची घालत असतात असाच वेदनादायक प्रवास शासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेले सेवा निवृत्त तहसीलदार तथा लेखक बंदु कमळू गायकवाड बि.के.गायकवाड यांनी आपल्या स्वतःच्या जीवनावर लिहलेले आत्मचरित्र वेदनेच्या  वाटेवरून या पुस्तकाचे लिखाण करून आपला वेदना दायक प्रवास वाचकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे

या  पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी सकाळी ११ वाजता अन्नपूर्णा लॉन शेरे पाडा सापगावं, शहापूर येथे जेष्ठ साहित्यिक प्रा. दामोदर मोरे यांचे अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे  जेष्ठ साहित्यिक      योगीराज बागुल, किर्ती महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुभाष दोंदे, ॲड. संतोष  मोहीते, नडगाव किसान हायस्कूलचे मुख्याध्यापक कुमार उबाळे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते तर कुर्ला मुंबई तहसीलदार संतोष थोरात, रायगड सेवा निवृत्त तहसीलदार बाबुराव निंबाळकर, 

सिंधुदुर्ग सेवा निवृत्त तहसीलदार मोरेश्वर हाडके हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते लेखक बंदु कमळू गायकवाड (बि.के.गायकवाड) लिखित आत्मचरित्र वेदनेच्या वेदनेच्या वाटेवरून या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सावंत यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक बाळ प्रकाशन प्रकाशक बापू पाटील, घनश्याम गायकवाड, प्रकाश भोईर, अरुण संगारे, अनंता पंडित, राहुल साळवे आदींचे विशेष सहकार्य लाभले.

जेष्ठ साहित्यिक प्रा. दामोदर मोरे, योगीराज बागुल, प्रा. डॉ. सुभाष दोंदे, ॲड. संतोष  मोहीते,  मुख्याध्यापक कुमार उबाळे  कुर्ला मुंबई तहसीलदार संतोष थोरात, सेवा निवृत्त तहसीलदार बाबुराव निंबाळकर,  मोरेश्वर हाडके, बाळ प्रकाशन प्रकाशक बापू पाटील यांच्या हस्ते वेदनेच्या वाटेवरून पुस्तक प्रकाशन करण्यात आले.

संबंधित पोस्ट