ऐरोली मधील महावितरण लोक सेविकेला जोर का झटका! ५० हजार रुपयाची लाच स्विकारताना अटक!

ठाणे लाचलुचपत विभागाची कारवाई!..

नवीमुंबई ( प्रतिनिधी):  शासनाने किती वेतन दिले तरी पैसा कमावण्याच्या  हव्यासापोटी काही शासकीय अधिकारी कोणत्या थराला जातील त्याचा नियम नाही असाच प्रकार ऐरोलीतील महावितरण कार्यालयात घडल्याचे चित्र समोर आले आहे याबाबत ठाणे विभागातील लाच लुचपत विभागाने कारवाई करून अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्षा देशमुख यांच्यावर कारवाई केली असुन त्यांना लाचेची रक्कम ५० हजारा सह रंगेहात पकडण्यात ठाणे लाचलुचपत विभागाला यश आले आहे.

याबाबत माहिती अशी की तक्रारदार महिला या इलेक्ट्रिक कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल कनेक्शनमध्ये अतिरिक्त लोड वाढविण्या करिता सर्व कागदपत्रासह ऐरोली महावितरण कार्यालयात प्रयत्नशील होत्या सदर कागद पत्र मंजुरीसाठी कार्यकारी अभियंता वाशी यांच्याकडे पाठविण्याकरिता ऐरोली येथील महावितरण कार्यालयाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्षा देशमुख यांच्या शिफारसीची आवश्यकता असल्याने तक्रारदार महिला या सतत त्यांच्या कामाचा पाठपुरावा करत होत्या मात्र अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्षा देशमुख यांनी तक्रारदार महिलेकडे ५० हजार रुपयाची लाच ची मागणी केली त्यानुसार तक्रारदार महिलेने ठाणे लाचलुचपत विभागाकडे २५ मार्च २०२२ रोजी तक्रारी अर्ज करून कारवाईची मागणी केली होती या प्रकरणाची ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने गंभीर दखल घेऊन ऐरोली येथील महावितरण कार्यालयात ३० मार्च  २०२२ सापळा रचून वर्षा देशमुख यांना ऐरोली महावितरण कार्यालयात ५० हजार रुपये रकमेची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे याबाबत ऐरोली महावितरण कार्यालयात एकच खळबळ उडाली . महावितरणच्या ग्राहकाकडून समाधान व्यक्त होत आहे

दरम्यान सदर कारवाई पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरोच्या माया मोरे यांनी केली असून वर्षा देशमुख यांच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात १६३/२०२२ भ्र.प्रति १९८८ चे क ७ प्रमाणे गुन्हा नोंद असून पुढील तपास ठाणे लाचलुचपत विभागाचे अधिकारी करत आहेत

संबंधित पोस्ट