
सोनसाखळी चोरीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
दोन आरोपी गजाआड!.. चार सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघड..
नवी मुंबई : कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोनसाखळी चोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आले होते या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कळवा पोलिसांनी सोनसाखळी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांना गजाआड केले आहे.
याबाबत माहिती अशी की पारसिकनगर मध्ये राहणाऱ्या वयोवृद्ध महिला सुनिता बाजीराव चासकर वय वर्षे (60) यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी चोरट्याने खेचून पोबारा केला होता याबाबतची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात 6/22 ,392,34, या प्रमाणे दाखल करण्यात आली होती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड, व गुन्हे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोनसाखळी चोरांचा बिमोड करण्यासाठी एक वेगळी टीम निर्माण केली होती त्या टीम च्या माध्यमातून सोनसाखळी चोरांचा शोध सुरू होता त्यातच मोटरसायकलवर फिरत असलेल्या 2 संशयित तरुणांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोटरसायकल न थांबवता पोलिसांना चकवा देत पळ काढण्याचा प्रयत्न केला कळवा पोलिसांनी त्यांचा शिफारसीने पाठलाग करून यांना ताब्यात घेतले असता अधिक चौकशी दरम्यान ते सोनसाखळी चोरटे असल्याचे पोलिसांना खात्री पटली या सोनसाखळी चोरणाऱ्या 2 तरुणांना कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सदर चोरट्यांचे नाव (1)हुजेफा अफसर शहा वय वर्षे (19) (2) कासिम जाफर कादरी असे असून ते मफतलाल कंपनी कळवा येथे राहणारे आहेत
दरम्यान: घटना स्थळी कोणतेही पुरावे नसताना पोलिसांनी या आरोपीना शोधून बेड्या ठोकल्या आहेत या आरोपीं कडून 2 लाख रुपयाचा मुद्देमाल आणि एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. या आरोपीना ठाणे न्यायालयाने 9 तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे तर या मागे मोठी टोळी असल्याचा संशय देखील कळवा पोलिसांनी व्यक्त केला असून महिलांनी घराबाहेर पडताना महागडे दागिने घालू नये व रस्त्यावर चालताना आपल्या दागिन्यांची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी केले आहे. अधिक तपास कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बघदाणे करत आहेत
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम