
वासींद येथे पदयात्रा करून जनजागरण अभियानाचा समारोप
- by Mahesh dhanke
- Nov 30, 2021
- 486 views
शहापूर : ठाणे जिल्हा ग्रामीण सह शहापूर तालुका काँग्रेस कमिटीने 14 ते 29 नोव्हेंबरमध्ये महागाई व केंद्र सरकार विरोधात जनजागरण करण्यासाठी विविध उपक्रम राबवून वासींद येथे पदयात्रा काढून या अभियानाचा समारोप केला.
ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे व शहापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यात महागाई व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात जनजागरण अभियान राबविण्यात आले,ग्राम बैठका, पत्रक वाटप,कीर्तन,पत्रकार संवाद आणि पदयात्रा काढून जनजागरण करण्यात आले,या अभियानाचा समारोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा कोकणचे प्रभारी बी एम संदीप यांच्या अध्यक्षतेखाली वासींद येथे पदयात्रा करून करण्यात आला.समारोप प्रसंगी त्यांनी ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल कौतुक केले तर मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली,संविधान आणि शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे सरकार मुळापासून उपटून फेकण्याची गरज असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचा खरा चेहरा उघड करण्यासाठी मेहनत घ्यावी असे आवाहन श्री संदीप यांनी केले.
या प्रसंगी माजी खासदार सुरेश टावरे,ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे,जेष्ठ नेते प्रकाश भांगरथ,तालुका अध्यक्ष महेश धानके, मुरबाड तालुका अध्यक्ष चेतन पवार,कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे, सेवादल जिल्हा अध्यक्ष नरेश मोरे,ओबीसी जिल्हा अध्यक्ष भास्कर जाधव पर्यावरण जिल्हा अध्यक्ष रामचंद्र जोशी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण घरत सरचिटणीस रवींद्र परटोळे,देवेन्द्र भेरे,अंकुश भोईर,शैलेश राऊत,जितू विषे,दशरथ भोईर,दशरथ तारमले,दत्ता बरोरा,रवी भोईर,तानाजी घागस,शांताराम धामणे, गुरुनाथ पाटील बळीराम तारमले,वसंत तारमले,व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम