उल्हासनगरात कोरोनाचे नियम पाळा,अन्यथा कारवाई .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात चार दिवसात एकुण ४५ रुग्णांची वाढ झाल्याने नागरिका मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.तेव्हा या कोरोना वर मात करण्यासाठी महापालिका सतर्क झाली असुन व्यापारी व नागरिक यानी  नियमाने मास्क लावणे . फिजिकल डिस्टंसिंग ठेवणे व सॅनिटायझरिग करणे असे नियम पाळण्याचे आव्हान महापौर लिलाबाई आशान उपमहापौर भगवान भालेराव आणि शहर प्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी यानी केले आहे . 

उल्हासनगर शहरात गेल्या चार दिवसात एकुण ४५ कोरोना ग्रस्त  रुग्ण मिळुन आले आहे . तर सध्या महापालिकेने  कोविड प्लॅटिनम हे खाजगी हॉस्पिटल दरमहा १० लाख रुपये भाडे व इतर खर्च १० लाख असे २० लाख रुपये दरमहा खर्चुन भाड्याने घेतले आहे . इतर कोविड सेंटर बंद केले आहेत . दरम्यान शासनाने कोरोनाची दुसरी लाट येणार म्हणुन सर्व महापालिकेने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत . त्याच पार्श्वभुमीवर उल्हासनगर महापालिकेच्या महापौर लिलाबाई आशान . उपमहापौर भगवान भालेराव यानी पत्रकार परिषद घेवुन कोरोना च्या बाबत नागरिकाना सावध राहण्याचे आव्हान केले आहे तर विना मास्क फिरणाऱ्याना प्रथम २०० रुपये दंड तर दुसऱ्यांदा विना मास्क मिळाले तर ५०० रुपये दंड होणार आहे . आणि तिसऱ्यांदा विना मास्क मिळाले तर सरळ गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येणार असल्याचे महापौर यानी सांगितले आहे . दरम्यान दुकानदार  व व्यापारी यानी नियमाचे पालन केले नाही तर प्रथम २००० हजार रुपये दंड आकारण्यात येणार असुन दुसऱ्यांदा नाही नियम पाळले तर ५००० हजार रुपये दंड होणार आहे . आणि तिसऱ्यांदा पुन्हा तिच चुक केली तर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे . त्यातच लग्न हॉल.   लॉंस . बंदिस्त सभागृहे . खुले मैदान येथे ही नियम नाही पाळले तर त्याना २० हजार रुपये दंड आकारण्यात येणार असुन दुसऱ्यांदा गुन्हा दाखल होणार आहे . दरम्यान तिसऱ्यांदा ही आस्थापणे  सील करण्यात येणार आहेत . असे सक्तीचे आदेश महापौर लिलाबाई आशान . उपमहापौर भगवान भालेराव यानी दिले आहेत . तर शहरातील सर्व दुकाने आज पासुन सकाळी ९ ते संध्याकाळी ९ पर्यंतच खुली राहणार आहेत . त्यामुळे सर्व नागरिकानी कोरोनाचे नियम पाळावे असे ही आव्हान  करण्यात आले आहे .

संबंधित पोस्ट