
अभय योजना ही नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार .
- by Rameshwar Gawai
- Feb 22, 2021
- 1123 views
उल्हासनगर(रामेश्वर गवई) : उल्हासनगर महापालिकेने नुकतीच पुन्हा अभय योजना लागु केली आहे . पण ही अभय योजना नागरिकांच्या कोणत्या ही फायद्याची नाही . या योजने मुळे मालमत्ता करातील फक्त व्याज माफ होणार आहे . जर मालमत्ता करातील ५० टक्के रक्कम माफ केली असती तर हीच खरी अभय योजना ठरली असती . मात्र या सत्ताधाऱ्यानी ही फसवी अभय योजना सुरु केल्याचा आरोप नागरिक करत आहेत .
उल्हासनगर मधील जनता ही कोरोनाच्या प्रादुर्भावाने होरपळुन निघाली आहे त्यांचे रोजगार गेले आहेत . त्यातच वीज बिलाचा झटका आणि वरुन मालमत्ता करात सुट देण्या ऐवजी फक्त मालमत्ता करातील व्याज माफ करण्या करिता ही अभय योजना सुरु केली . शहरात लाखाच्या वर मालमत्ता कर धारक आहेत.यातील बहुतेक झोपडपट्टीतील गोर गरीब नागरिक आपले मालमत्ता कर नियमित पणे भरतो . मात्र शहरातील मोठ मोठे बागड बिल्ले हे मालमत्ता कर भरत नाहीत . तर त्यांच्यावर महापालिका कोणती ही कारवाई करत नाही . दरम्यान या सत्ताधाऱ्यानी अभय योजना सुरु करुन फार मोठे उपकार शहरवासीयांवर केले असे त्याना वाटत आहे . मात्र ही अभय योजना येथिल नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे . कोरोनाच्या प्रादुर्भावाने शहरातील गोर गरीब नागरिक उध्वस्त झाला आहे . त्याला वीज बिला पासुन ते मालमत्ताकर माफी ची गरज असताना फक्त व्याज माफ करण्या साठी ही योजना लागु केली आहे . दरम्यान १५ दिवसात ८० टक्के व्याज माफ होणार असुन उर्वरित १५ दिवसात फक्त ५० टक्के व्याज माफ होणार आहे . जर या सत्ताधाऱ्याना अभय योजना सुरु करायची होती तर मालमत्ताकर ५० टक्के माफ करण्या साठी करायची होती . तेवढाचा मालमत्ताकर धारकाना दिलासा मिळाला असता . पण याना नागरिकांची फसवणुक करुन त्याना वेड्यात काढण्याचा हा प्रकार आहे . दरम्यान मालमत्ता कर विभागात करोडोचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला अभय देवुन त्याला वाचवन्यात आले आहे . मात्र गोर गरीबाला मालमत्ताकरात कोणती ही सुट न देता फक्त व्याज माफ करण्यासाठी अभय योजना सुरु केली आहे . मात्र या योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद देखिल मिळत नसल्याचे दिसुन येते . या शहरात मोठ मोठे मालमत्ताधारक आहेत त्यांच्यावर करोडो रुपये मालमत्ता कर आहे . परंतु त्यांची मालमत्ता सिल करण्याची जरा ही धमक महापालिकेने दाखवली नाही मात्र गोर गरीबांच्या मालमत्तेवर लवकरच महापालिका टाच आणते . दरम्यान सध्या सुरु केलेली अभय योजना ही फसवी आहे . महापालिकेने नागरिकाना किमान ५० टक्के तरी मालमत्ता करात सुट द्यायला पाहिजे होती . तेव्हा ही खरी गोर गरीबांच्या हिताची अभय योजना वाटली असती .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम