उल्हासनगर महानगरपालिकेचा हलगर्जीपणा अपघाताला आमंत्रण देणारा खड्डा .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर कुर्ला कँम्प - शिव मंदिर रोडवरील रस्त्याच्या मध्यभागी  असलेल्या नाल्यावर पडलेल्या भल्यामोठ्या भगदाडामुळे अंदाजे गेल्या सात आठ महिन्यांपासून रहदारीसाठी हा रस्ता पुर्णपणे बंद करण्यात आला होता.आता दोन दिवसांपूर्वी अचानक हा रस्ता रहदारी करिता खुला करण्यात आला असल्याने महानगर पालिकेने ह्या रस्त्यावरील नाल्याच्या दुरुस्तीचे काम केले असावे असा अंदाज आला.पण जसेच या रस्त्यावरून पुढे मार्गक्रमण केले.तेव्हा सात ते आठ महिन्याअगोदर रस्त्यावरील नाल्यावर पडलेल्या भगदडाची स्थिती जैसे थे अशीच दिसली.त्यामुळे या खड्ड्यामुळे केव्हा ही अपघात घडु शकतो . हा एक प्रकारे महापालिकेचा हलगर्जी पणाच असल्याचे समोर आले आहे . 

उल्हासनगर कुर्ला कँम्प - शिव मंदिर रोडवरील रस्त्याच्या मध्यभागी  असलेल्या नाल्यावर पडलेल्या भल्यामोठ्या भगदडाच्या समोरील बाजूला सुक्या झाडाच्या फांद्या टाकून महानगरपालिकेने आपला हलगर्जी पणा उघड केला असल्याचे दिसून आले वाहतूक आणि रहदारीच्या नियमानुसार धोकादायक रस्त्याबाबत नागरिकांना धोक्याची सुचना देण्यासाठी एखाद्या फलक लावावा ही साधी तसदी सुद्धा महानगर पालिकेच्या वतीने घेण्यात आलेली दिसून येत नाही.अशावेळी जर या रस्त्यावर अनपेक्षित पणे एखाद्या अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न येथिल समाजसेवक व पत्रकार मनोज कोरडे यानी उपस्थित केला आहे.   

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून हा रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला असताना महानगरपालिकेने ह्या कालावधीत या रस्त्याची दुरुस्ती का केली नाही.आणि आता दुरूस्ती न करताच हा रस्ता वाहतूकीसाठी खुला का केला असा प्रश्न मात्र सर्व सामान्य नागरिकांना नक्कीच पडला असावा.एकिकडे महानगरपालिकेकडून ( कदाचित निवडणुका जवळ आल्या असल्याने नगरसेवकांच्या आदेशानुसार ) संपूर्ण शहरात रस्त्यांवर पडलेल्या  खड्ड्यांवर डांबरीकरण करून डागडुजीचे काम जोरात सुरू असताना दुसरीकडे मात्र कुर्ला कँम्प - शिव मंदिर रोडबाबतचा उल्हासनगर महानगरपालिकेचा हलगर्जीपणा हा अपघाताला आमंत्रण देणारा ठरत असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित पोस्ट