वालधुनी नदीत केमिकल सोडणाऱ्या कंपन्यावर कारवाईला सुरवात .

उल्हासनगर(प्रतिनिधी): वालधुनी नदीत घातक केमिकल सोडुन नदीला  प्रदूषित करणाऱ्या  ७०   केमिकल कंपन्याचे   वीज व  पाणी तोडले नाही तर बेमुदत उपोषणाचा इशारा नगरसेविका सविता तोरणे व समाजसेवक शिवाजी रगडे यानी एम आय डी सी व महाराष्ट्र प्रदुषण बोर्डाला दिली होती तेव्हा या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यानी नगरसेविका तोरणे,शिवाजी रगडे आणि शशिकांत दायमा याना केमिकल कंपन्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे प्रत्यक्षात दाखवुन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले असता सदर कंपन्यावर कारवाई होत असल्याने उपोषण व आंदोलन मागे घेत  असल्याचे शिवाजी रगडे यानी सांगितले आहे


अंबरनाथ एम आय डी सी मधील केमिकल कंपन्या मधुन  वालधुनीत घातक केमिकल सोडण्यात येते तेव्हा वालधुनी नदीच्या काठावर राहणाऱ्या सम्राट अशोक नगर . वडोल गांव . संजय गांधी नगर ते शांती नगर पर्यंत राहणाऱ्या नागरिकाना त्या घातक केमिकलचा  मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे . त्यामुळे नगरसेविका सविता तोरणे . समाजसेवक शिवाजी रगडे यानी  एमआय डी सी  पुर्व  व पश्चिम मध्ये असलेल्या ७०  केमिकल कंपन्यांची वीज व पाणी तोडण्याची मागणी  महाराष्ट्र प्रदुषण बोर्ड आणि एम  आय डी सी कडे केली होती . तर या कंपन्यावर कारवाई केली नाही तर एम आय डी सी कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता . तेव्हा या इशाऱ्याची दखल घेत एम आय डी सीने  सदर कंपन्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे . दरम्यान समाजसेवक शिवाजी रगडे व वालधुनी जल बिरादरीचे प्रमुख शशिकांत दायमा याना एम आय डी सी च्या अधिकाऱ्यानी समक्ष बोलवुन केमिकल कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत . त्यामुळे आंदोलन व उपोषण करु नये अशी विनंती या अधिकाऱ्यानी केली . त्यामुळे केमिकल कंपन्यावर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने संभाव्य आंदोलन व उपोषण स्थगित करण्यात येत असल्याचे शिवाजी रगडे यानी जाहीर केले आहे .

संबंधित पोस्ट