छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आरोग्य शिबिर संपन्न

उल्हासनगर(प्रतिनिधी) :   लोक राज्य सामाजिक संस्थाचे अध्यक्ष  विनोद बा-हे युवा समाजसेवक  विक्की गुरनानी , कमल पंजाबी  , यांनी  जाणता राजा छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधून भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन  रामचंद्रजी फटाकेवाला  सी राॕक पॕलेस समोर सेक्शन  २८ पुनम हाॕटेल समोर उल्हासनगर - ४ या ठिकाणी करण्यात आले होते. पुन्हा महाराष्ट्रात  कोरोना चा प्रादुर्भाव वाढत चालला आहे .दररोज रुग्ण वाढतच चालले आहेत . तेव्हा आरोग्य शिबीराचे आयोजन करुन  या शिबीरात विविध आजाराच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत . त्या मध्ये  मुत्रपिड  व मुत्रमार्ग  विकार, बालरोग,आस्थिरोग . त्वचा रोग .  स्रीरोग व प्रस्तूतिशास्त्र .   मोफत  औषधे   इ, सी, जी, मधुमेह तपासणी  नेत्र तपासणी करुन  अल्पदरात  चष्मे असे विविध रुग्णांची  तपासणी  उल्हासनगर - ३ येथिल मध्यवर्ती रुग्णालयाचे डॉ चंद्रजित यादव  डॉ सुनंदा ओहोळ,डॉ,विद्या चौधरी,संदेश महाळ  प्रज्ञा कांबळे  व जितेद्र वाघ,आकाश सकपाळ,जितेद्र दोंडे यांनी तपासणी केली असून या शिबिराचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला आहे .या आरोग्य शिबीराच्या कार्यक्रमाला  विठ्ठलवाडी  पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस  निरीक्षक  कन्हैय्या  थोरात अपंग आधार सेवा संस्थाचे अध्यक्ष  निलेश विनायक जाधव,पत्रकार सुरक्षा समितीचे सदस्य व पत्रकार अशोक शिरसाट  व नरेशभाई यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते  पत्रकार  समाज सेवक आदी मान्यवर उपस्थित होते .

संबंधित पोस्ट