उल्हासनगरात शिवजयंती धामधुम मध्ये साजरी .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : छ्त्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती अत्यंत धुमधाम मध्ये साजरी करण्यात आली आहे . या जयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी शरबत नास्ता मिठाई वाटप करुन शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाना अभिवादन करण्यात आले आहे . 

उल्हासनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती निमित्ताने सर्वच राजकिय पक्ष सामाजिक संस्था यानी विविध ठिकाणी महाराजाना अभिवादन केले  .तर  येथिल मध्यवर्ती रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . सुधाकर शिंदे व त्यांच्या कर्मचाऱ्यानी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन केले तर सम्राट अशोक नगर येथे अशोका फाऊंडेशन च्या वतीने शिवाजी रगडे यानी पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले . दरम्यान २२ सेक्सन कॅंप ३ येथे पत्रकार सुरक्षा समिती उल्हासनगर तालुका अध्यक्ष व पत्रकार रामेश्वर गवई . गौतम वाघ  रमेश कांबळे . सलिम मंसुरी . किरण तेलगोटे  सर्फराज खान . कुणाल कपुर यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजाना अभिवादन करुन शरबत चे वाटप केले . दरम्यान कॅंप ४ येथिल वॉटर सप्लाय विभाग येथे जयंती साजरी करुन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले . दरम्यान उल्हासनगर ३ . शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शहरातील नागरिकानी जावुन पुष्पहार घालुन अभिवादन केले तर शहरात जागो जागी रोषणाई करण्यात आली होती . मात्र या जयंती निमित्त कोविड चे सर्व नियम पाळण्यात आले होते तर शहरात पोलिसानी देखिल चांगल्या प्रकारे सहयोग देवुन जयंती उत्सवाला हातभार लावला आहे

संबंधित पोस्ट