उल्हासनगर येथिल सुभाषनगर शिरसाट गल्ली परिसरात तीव्र पाणी टंचाई.

उल्हासनगर(प्रतिनिधी) :  पॕनल नं. ८ सुभाषनगर उल्हासनगर - ३ मध्ये शिरसाट गल्ली  या परिसरात गेल्या साडेतीन वर्षापासून तीव्र पाणी टंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे.  मात्र नगर सेवक राहत असलेल्या व त्यांच्या कार्यालया जवळील   रोडवर मुबलक पाणी  पुरवठा  होत असल्याची तक्रार  पत्रकार सुरक्षा समितीचे सदस्य व भारतीय बौध्द महासभेचे उल्हासनगर तालुका संघटक अशोक शिरसाट  यांनी केली आहे . 

पॕलन नं. ८  सुभाषनगर उल्हासनगर - ३ येथे शिरसाट गल्ली ते हनुमान मंदिर या परिसरात शेकडो लोक राहतात . त्याना गेल्या साडेतीन वर्षापासून  तीव्र पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे.  मात्र या ठिकाणी राहत असलेल्या नगर सेवक यांच्या घराजवळ व  कार्यालयाजवळ आणि त्यांच्या मर्जितील  परिसरात मुबलक पाणीपुरवठा होत आहे इतकेच नव्हे तर या परिसरात अनेक ठिकाणी जलवाहिन्या तुटल्याने हजारो लिटर पाणी दररोज वाया जात असल्याची लेखी तक्रार शिरसाट  यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तरी पण महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग झोपेचे सोंग घेत आहे . उल्हासनगर  महापालिकेने  पाणी पुरवठा योजने  अंतर्गत कोणार्क कंपनीला कंत्राट देऊन नव्या ब्लूलाईन जलवाहिन्या टाकल्या आहेत .  मात्र तरीही त्याचा काही उपयोग झाला  नाही या विषयी वारंवार तक्रारी देऊन देखील पाणी पुरवठा सुरळीत होत नाही जर लवकरात लवकर सुभाष नगर शिरसाट गल्ली परिसरातील  पाणी समस्या सुटली नाही तर या परिसरातील नागरिक रस्त्यावर येतील असा इशारा पत्रकार सुरक्षा समितीचे तालुका सदस्य व भारतीय बौध्द महासभेचे तालुका संघटक  अशोक शिरसाट यानी दिला आहे .

संबंधित पोस्ट