खबरदार वीज ग्राहाकांना त्रास द्याल तर-मनसेचा इशारा .

उल्हासनगर(प्रतिनिधी) :महाराष्ट्र  राज्यासह संपूर्ण देशात कोरोना  ने थैमान  घातल्यामुळे जवळपास सर्वच नागरिकांची आर्थिक घडी विस्कळली असून बऱ्याच  नागरिकांना आपला उदरनिर्वाह चालविणे कठीण होऊन बसले आहे. काहीं नागरिकांच्या तर नोकऱ्याही गेल्या आहेत.आशा वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकार कडे वारंवार मागणी केली होती की कोविड कालावधीतील वीजबिलात नागरिकांना सवलत देण्यात यावी. याच अनुषंगाने उर्जामंत्री  डॉ .नितिन राऊत यांनी कोविड कालावधीतील वीजबिलात सर्व नागरिकांना ३० ते ४०% पर्यंत सुट देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्या नंतर त्यांनी पुन्हा घुमजाव करत ही सुट दिवाळी नंतर दिली जाईल अशी घोषणा केली.नागरिक आशा लावून बसले परंतु  सरकार कडून ही सुट आजही मिळाली नाही..आता तर उर्जामंत्री  यावर बोलायला सुध्दा तयार नाहीत. उलट नागरिकां कडून सक्तीने  वीजबिल वसूलीचे आदेश देण्यात आले आहेत. तर  वीज ग्राहका कडुन  ७०% च्या खाली रक्कम भरुन घ्यायची नाही असे आदेशच प्रशासनाने दिल्याचे समजते याच आदेशाचा बागुल बुवा करीत महावितरण चे कर्मचारी नागरिकांना घरोघरी जाऊन धमकवण्याचे काम करीत आहेत. कोणतीही पुर्व सुचना न देता किंवा ग्राहकांशी संवाद न साधता सरळ वीज मिटर काढून वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

कोरोना  काळात भरमसाठ वीजबिले  पाठविल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी महावितरण व  मनसे कडे  केल्या आहेत.असे असतांना महावितरण ने नागरिकांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम करुन मे पासून पुढील वीजबिलावर १-२५ व्याज आकारले आहे. मनसेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे की मार्च २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंतच्या सर्व वीजबिला तुन दंड व व्याजाची रक्कम तात्काळ वगळण्यात यावी जेणे करुन नागरिकांना तेवढा तरी दिलासा मिळेल अशी मागणी मनसे चे शहर अध्यक्ष बंडु देशमुख यानी महावितरण अभियंता याना निवेदनाद्वारे केली आहे . 

निवेदनात त्यानी म्हटले आहे की  जोर-जबरदस्ती करुन नागरिकांच्या घरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला तर आपल्या कर्मचाऱ्यांना मनसे स्टाईल ने उत्तर दिल जाईल व यानंतर उद्भवणाऱ्या   परिस्थितीस सर्वस्वी आपण व आपला विभाग जबाबदार राहील अशी समज मनसेच्या वतीने देण्यात आली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप गोडसे,शहर अध्यक्ष बंडू देशमुख,मनविसेचे  शहर अध्यक्ष मनोज शेलार,शहर सचिव शालिग्राम सोनवणे,उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव,ॲड .अनिल जाधव,मुकेश सेठपलानी सुभाष हटकर,मुकेश सेठपलानी,सचिन बेंडके, प्रा .प्रविण माळवे,यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट