अखेर आशासेविकांना मिळाल थकीत मानधन .
- by Rameshwar Gawai
- Feb 16, 2021
- 1002 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेने नेमलेल्या आशा सेविका ह्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जोडीने काम करत हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी जावुन नागरिकांच्या तपासण्या त्यांच्या नोंदी त्याना उपचार कसे मिळतील या करिता स्वताचे जीव घोक्यात घालुन काम करत होत्या . तर या कोरोना काळात घरचे म्हणत होते, ३० रुपयांंसाठी कशाला मरताय, पण तरीही झोपडपट्टी, इमारती, बॅरेक पिंजून काढुन कोरोनाचे संशयित रुग्ण शोधणं, त्यांना वैद्यकीय यंत्रणेपर्यंत पोहोचवण्यासाठी जीव धोक्यात घालुन् काम करत असताना त्यांना मिळणारे मानधन हे अल्प असल्याने समाजसेवक शिवाजी रगडे यानी पालकमंत्री एकनाथ शिंदे याना विनती करुन या आशा सेविकांचे मानधन वाढविन्याची मागणी केली होती ती मागणी मंजुर करुन त्याना ३०० रुपये दरदिवशी देण्याचे आयुक्तानी मान्य केले होते . परंतु हे मानधन देण्यास महापालिका टाकाटाळ करत होती अखेर रगडे यानी महापालिका प्रशासना कडे पाठपुरावा करुन ४२ दिवसाचे मानधन मंजुर करुन घेतले तेव्हा या मानधनातील अर्धे वेतन या आशा सेविकाना मिळाले आहे . दरम्यान या आशा सेविकानी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की आम्हाला कोरोनापासुन आमचं शहर वाचवायच होतं. शिवाजी रगडेंनी आमची खरी कदर केली. अन् प्रशासनाशी भांडून आमचं मानधन ३० रुपये रोज ऐवजी ३०० रुपये करून आमच्या पदरात पाडून दिलं.तर गहिवरल्या कंठाने आशा सेविका माया रौराळे यांनी आपल्या ११० आशा सेविकांच्या वतीने शिवाजी रगडे यांचे आभार मानले आहे .
या आशा सेविकांच्या साहसी कामगिरीबद्दल वाढिव मानधन मिळण्यासाठी नगरसेविका सविता तोरणे रगडे व अशोका फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी रगडे यांनी प्रशासना कडे सातत्याने पाठपुरावा केला होता.दरम्यान
आशासेविकाच्या बँक खात्यात मानधनाचा एक टप्पा जमा झाल्याने आशासेविका मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम