उल्हासनगर शहरातील नागरिकांसाठी पुर्वी प्रमाणे एस टी बसेस सुरू करा . मनसेची मागणी .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर महानगर पालिकेने स्वतःची परिवहन सेवा सुरू केल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने उल्हासनगर शहरातील बससेवा बंद केली होती. परंतु उल्हासनगर महानगर पालिकेने ठेकेदारा मार्फत सुरू केलेली बससेवा ही अल्पावधितच  बंद पडली.म्हणुन एस टी महामंडळाने पुन्हा उल्हासनगर शहरात बस सेवा सुरु करावी अशी मागणी मनसेने कल्याण एस टी आगर प्रमुख याना निवेदन देवुन केली आहे . 

उल्हासनगर शहरात एस टी बसेस नियमित प्रमाणे धावत होत्या . परंतु उल्हासनगर महापालिकेने स्वताची बस सेवा सुरु केल्याने एस टी महामंडळाने आपली बस सेवा बंद केली मात्र महापालिकेची बस सेवा अल्पावधितच बंद झाली आहे .   व नंतर ती परिवहन बस सेवा  आज पर्यंत सुरू होऊ शकली नाही आणि यापुढे सुरू होईल किंवा नाही याची कुठलीही शास्वती नाही.ही परिवहन सेवा  बंद होऊन आज जवळपास पाच ते सहा वर्षे उलटली आहेत. तरी सुध्दा  महापालिका प्रशासनाला ही बससेवा पुन्हा सुरू करण्यात यश आले नाही.महापालिकेची बस सेवा पुर्णपणे बंद असल्यामुळे उल्हासनगर शहरातील नागरिकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. म्हणुनच  ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उल्हासनगर शहरातील नागरिकांसाठी एस टी महामंडळाची बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी कल्याण एस टी  आगर प्रमुख  विजय गायकवाड  व विठ्ठलवाडी  आगर प्रमुख  शेळके मॕडम यांच्याकडे केली आहे. जेणे करुन  शहरातील नागरिकांना पुर्वी प्रमाणे बससेवा उपलब्ध होईल.ही बससेवा सुरू केली तर एस टी  महामंडळाच्या उत्पन्नात सुध्दा वाढ होईल व उल्हासनगर शहरातील नागरिकांना बससेवा ही मिळेल असे मनसेचे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी सांगितले.यावेळी हे निवेदन देताना उपजिल्हा अध्यक्ष प्रदिप गोडसे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख, मनविसे शहर अध्यक्ष मनोज शेलार, शहर सचिव शालिग्राम सोनवणे,उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव अॕड.अनिल जाधव,सुभाष हटकर,मुकेश सेठपलानी, मनविसेचे तन्मेश देशमुख, वाहतुक सेनेचे संजय साळवे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट