नाथपंथी डबरी गोसावी समाजातील भटकंती करणाऱ्या कुटूंबाना साड्या धान्य वाटप .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरा लगत असलेल्या पाचवा मैल येथे उल्हासनदीच्या  काठावर गेल्या एक हप्त्या पासुन वास्तव्यास असलेल्या सांगोला तालुक्यातील  नागपंथी डबरी गोसावी समाजाच्या  पाच कुटूंबाना रोड रोलर वेल्फेयर संघटने चे अध्यक्ष रशिद शेख यानी  साड्या धान्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे . 

सोलापुर जिल्ह्यातील सांगोला तालुका येथिल नाथपंथी डबरी गोसावी समाजातील काही कुटूंबे आपली धार्मिक परंपरा जपत तीन चाकी वाहनावर  देव देवताचे फोटो लावुन राज्यातील प्रत्येक शहरात जावुन देव देवतांच्या नावाने दान मागुन आपला उदरर्निवाह करतात .हे कुटूंबे प्रत्येक शहरात आठ ते दहा दिवस राहुन आपली उपजीविका करतात . तेव्हा पाचवा मैल येथिल उल्हास नदीच्या काठावर गेल्या काही दिवसा पासुन नाथपंथीय डबरी गोसावी समाजातील इंगोले ,भोसले,बाबर,आणि अन्य असे पाच कुटुंबे हे वास्तव्यास आहेत.ते  कपड्यांचे पाल मांडुन  राहत आहेत . तेव्हा रोड रोलर वेल्फेयर संघटनेचे अध्यक्ष रशिद शेख यानी या कुटुंबाची आस्थेने विचारपुस केली . दरम्यान काही वस्तुची गरज असल्याचे त्यानी सांगितले त्यामुळे रशीद शेख यानी ताबडतोब त्या पाच कुटुंबाना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्याचे निश्चित केले . आणि या जीवनावश्यक वस्तुचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्याचे ठरवुन ते पाच कुटुंबे राहतात त्या ठिकाणी एक छोटा खानी कार्यक्रम आयोजित केला . तर अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष व ज्येष्ट पत्रकार दिलीप मालवणकर . ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री सासे. उल्हासनदी बचाव कृती समितीचे अध्यक्ष अश्विन भोईर .उल्हासनगर तालुका  पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष व पत्रकार रामेश्वर गवई,उपाध्यक्ष सलिम मंसुरी . सचिव किरण तेलगोटे आणि भिसोळ चे उपसरपंच महेश चोरगे  यांच्या उपस्थितीत या कुटुंबातील महिलाना साड्या ,साखर गहु तांदुळ दाळी तेल मीठ यांचे वाटप केले . तर ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यानी या पाच ही कुटुंबाना प्रत्येकी एक हजार रुपये या प्रमाणे पाच हजार रुपयाचे दान देवुन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे .  या कार्यक्रमाचे सुत्र संचालन माजी नगरसेवक व ज्येष्ठ पत्रकार रामदास लोणे यानी केले आहे .तर रोड रोलर वेल्फेयर संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष रशीद शेख . सचिव तानाजी पालवे संभाजी पालवे,सल्लागार प्रमोद काळे. संदीप चोरगे यानी हा साड्या व धान्य वाटप कार्यक्रम केल्याने उपस्थीत पाहुण्यानी त्यांचे अभिनंदन केले आहे .

संबंधित पोस्ट