आरोग्य सेवांच्या दक्षते करिता वंचितची मागणी .

उल्हासनगर(प्रतिनिधी): भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात लागलेल्या अपघाती आगीमुळे ७ नवजात बालकांना जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर मध्यवर्ती शासकीय रुग्णालयातील अनेक सोयी सुविधांंकडे वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शाखेने लक्ष वेधले आहे. या रुग्णालयातील त्रुटी व उपाय योजनांचा अभाव यामुळे भंडाऱ्या  सारखी आपत्ती ओढवण्याची शक्यता भारीप बहुजन महासंघाचे उल्हासनगर महासचिव रतन खैरनार यांनी व्यक्त केली आहे. 

याची दक्षता घेऊन आरोग्य विभागाने रुग्णालयातील सोयीसुविधा अद्ययावत कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे वंचित बहुजन आघाडीच्या  शिष्टमंडळाने केली आहे. शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांची भेट घेऊन शासकीय  रुग्णालयाचे फायर आँडिट, स्ट्रक्चर ऑडिट तातडीने करून उणिवांची पुर्तता करण्यासाठी हे निवेदन देण्यात आले  ज्यावर शासनाकडे रिक्त पदांची भरतीप्रक्रिया, व इतर सोयींकरीता युध्दपातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ सुधाकर शिंदे यांनी सांगितले आहे .

या शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहराच्या वतीने सचिव हरेश  कथले उपाध्यक्ष ज्ञानदेव सुरवाडे, शहर उपाध्यक्ष विद्याधर पाटील, शहरउपाध्यक्ष विजय धावारे संघटक विक्की वानखेडे, नितिन भालेराव, निलेश देवडे ,नमराज सोनार, मुकेश जाधव, सिद्धार्थ सावळे, अरुण धनगर, सुरेश बागुल आदी उपस्थित होते

संबंधित पोस्ट