उल्हासनगर मधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची तोडक कारवाई .

उल्हासनगर(प्रतिनिधी): उल्हासनगर महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामाचे  पेव पुटले असुन चार ही प्रभागात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत मात्र या बांधकामाच्या बऱ्याच तक्रारी असल्याने महापालिका उपायुक्त मदन सोंडे यानी या अनधिकृत बांधकामाची यादी मांगवली आहे . त्यामुळे आता सदर बांधकामांवर महापालिकेची तोडक कारवाई होणार असल्याने येथिल भुमाफियांचे धाबे दणाणले आहे . 

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात चार प्रभाग समित्या असुन या चार ही समित्याचे चार प्रभाग अधिकारी आहेत . ज्या ही प्रभागात अनधिकृत बांधकाम होईल त्या बांधकामाला प्रभाग अधिकारी जबाबदार राहणार असल्याचे आयुक्तानी या पुर्वीच जाहीर केले होते .तरी पण प्रत्येक प्रभागात अनधिकृत  बांधकाम होत आहे तेव्हा बांधकामाच्या अनेक तक्रारी महापालिकेत आल्या आहेत . त्याच अनुषंगाने उपायुक्त मदन सोंडे यानी चार ही प्रभाग अधिकाऱ्या कडुन अनधिकृत बांधकामाची यादी मांगवली आहे . तर काल कॅंप न . २ येथिल दुर्गानगर मध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामावर प्रभाग अधिकारी अनिल खतुरानी यानी तोडक कारवाई केली आहे . तर प्रभाग समिती १ च्या अखत्यारित असलेल्या उल्हासनगर कॅंप १ येथिल बस स्थानका जवळ एक अनधिकृत बांधकाम झाले असुन त्या बांधकामावर महापालिका तोडक कारवाई का करत नाही या बाबत शंका व्यक्त होत आहे

संबंधित पोस्ट