
उल्हासनगर महापालिकेचे दोन सफाई कामगार विजेचा शॉक लागुन भाजले .
- by Rameshwar Gawai
- Feb 09, 2021
- 597 views
उल्हासनगर(प्रतिनिधी): उल्हासनगर महापालिकेच्या पॅनल ९ मध्ये सफाई चे काम करणारे दोन सफाई कामगार काल ट्रांसफारमर च्या खाली सफाई करत असताना या दोन कामगाराना अचानक विजेचा शॉक लागुन हे दोन कामगार गंभीर जखमी झाले असुन त्याना येथील खाजगी मीरा रुग्णालयात उपचारा करिता दाखल केले आहे .तर नगरसेविका दिपा पंजाबी यानीच त्या ट्रांसफारमर च्या खाली सफाई करण्यास पाठविल्याचा आरोप कामगार नेते चरणसिंग टाक यानी केला आहे .
उल्हासनगर कॅंप ३ येथिल पॅंनल ९ मध्ये महापालिकेचे सफाई कामगार लखन राजवीर करोतिया (२२) व सनी पुरण करोतिया (२५) हे दोन सफाई कामगार सफाई चे काम करत होते . दरम्यान त्या पॅनल ची नगरसेविका दिपा नारायण पंजाबी यानी त्या दोघा कामगाराना बाजुलाच असलेल्या विद्युत ट्रांसफारमर मध्ये सफाई करण्यास पाठविले . मात्र त्या दोघाही कामगाराना अचानक विद्युत ट्रांसफारमर चा शॉक लागला व ते दोघे ही कामगार गंभीर जखमी झालेत . त्याना ताबडतोब उपचारा करिता मीरा रुग्णालयात दाखल केले आहे . मात्र या गंभीर प्रकाराला नगरसेविका दिपा नारायण पंजाबी ह्या जबाबदार असुन त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी कामगार नेते चरणसिंग टाक यानी केली असुन सोबतच महापालिकेने त्या कामगाराना उपचारा करिता २० हजार रुपये देण्यात यावे अशी ही मागणी टाक यानी केली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम