उल्हासनगरचे भाजपा आमदार निष्क्रिय . भाजपा नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांची टिका .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर शहराला लाभलेले भाजपाचे आमदार कुमार आयलानी यांच्या नियोजन शुन्य कामामुळे शहरात भाजपाचे मोठे नुकसान झाले असुन या आमदाराने शहरात एक ही अशी योजना आणली नाही . तर शहर भाजपाचे आमदार  निष्क्रिय झाल्याची टिका भाजपाचे स्विकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानी यानी केली आहे

उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी हे अत्यंत निष्क्रिय असुन त्यानी आमदार झाले तेव्हा पासुन एक ही योजना शहरात आणली नाही तर उल्हासनगर महापालिकेत सर्वात जास्त नगरसेवक भाजपाचे असताना सुध्दा  भाजपाला सभागृहात विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याची वेळ आली आहे . तर महापौर . उपमहापौर . स्थायी समिती सभापती निवडणुकीत आमदार कुमार आयलानी यानी रणनिती न आखल्या मुळेच  दारुण व लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला .या पराभवाला आमदार आयलानी हेच जबाबदार असल्याची टिका भाजपा चे स्विकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानी यानी केली आहे . दरम्यान विधानसभा निवडणुकीत म्हारळ . वरप . कांबा या तिन ही गांवातील मतदारानी कुमार आयलानी याना मतदान केले परंतु त्यानी या गांवाच्या विकासा   करिता कोणते ही काम केले नाही . उलट म्हारळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला आहे . या निवडणुकीत भाजपाला फक्त सात जागे वरच समाधान मानावे लागले आहे  तर  गेल्या वेळेस १७ जागा म्हारळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडुन आल्या होत्या . हा फटका सर्व आमदार आयलानी यांच्या निष्क्रियते मुळे बसल्याचा आरोप प्रदीप रामचंदानी केला आहे .  दरम्यान अयोध्या येथिल राममंदिराच्या उभारणी करिता देश विदेशातुन देणग्या येतात तेव्हा उल्हासनगर शहर हे धार्मिक शहर असल्याने येथिल नागरिकानी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या असत्या परंतु आमदार कुमार आयलानी यानी कार्यकर्त्याना  विचारात न घेता दोन चांदीच्या विटा देवुन मोकळे झाले असुन त्यानी शहरात पक्ष संपवण्याचा एक प्रकारे विडाच उचलल्याचे दिसुन येत आहे.  अशी ही टिका रामचंदानी यानी केली आहे . या बाबत आमदार कुमार आयलानी यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवु शकला नाही .

संबंधित पोस्ट