मीरा रोड पूर्व येथील हेल्पींग सोशल फाउंडेशनच्या वतीने महिला सायकल रॅलीचे आयोजन

मुंबई (प्रतिनिधी) मीरा रोड पूर्व येथील हेल्पींग सोशल फाउंडेशनच्या वतीने महिला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हेल्पींग सोशल फाउंडेशनच्या प्रमुख समाज सेविका दीपा सूर यांच्या मार्गदर्शना खाली हा सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आयोजित करण्यात आलेला सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. विशेषत: मीरा रोड पूर्व ते गोराई बीच अशा ३० किलो मीटर मार्गावर आयोजित केलेल्या या महिला सायकल रॅलीला महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.या महिला सायकल रॅलीत बॅनर ,फलक , पोस्टर्सच्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन केले होते.तसेच "या चला मिळून साऱ्या जणी एकट्या असणाऱ्या आईच्या मदतीसाठी आपण निधी गोळा करूया" अशा संकल्पनेवर आधारित सायकल रॅलीतील महिलांना मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी देणगी दिली. महिला सायकल रॅलीत देणगी रूपाने महिलांनी निधी गोळा केला आणि त्या जमलेल्या निधीतून झोपडपट्टीत एकट्या रहात असणाऱ्या वृध्द , गरीब महिलांना आर्थिक मदत देण्यात आली. त्यात काही निराधार महिला, आणि काही काबाड कष्ट करून कसं बसं घर चालवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या  महिलांना समाज सेविका दीपा सूर यांनी आर्थिक मदत केली.तसेच एका गरीब महिलेच्या कानावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी आणि श्रवण यंत्रासाठी 35000/- रूपयांची दीपा सूर यांनी आर्थिक मदत केली.मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सहकार्याने हेल्पींग सोशल फाउंडेशनच्या वतीने "बेटी बचाव बेटी पढाव" झोपडपट्टीतील गरीब मुलांना खाऊ आणि खेळणी वाटप , गरीब महिलांना आर्थिक मदत देऊन व्यवसाय उपलब्ध करून देणे , गरीब मुलानां शैक्षणिक मदत , टाटा कॅन्सर पिडीतांना आर्थिक मदत आणि कॅन्सरग्रस्त मुलांना खाऊ खेळणी वाटप ,असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच हेल्पींग सोशल फाउंडेशनच्या वतीने कोरोना पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या काळात  गोरगरीब वंचित लोकांना मास्क,सॅनिटायजर आणि अन्नधान्य वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.

संबंधित पोस्ट