उल्हासनगर महापालिकेत आलेल्या राष्ट्रिय सफाई आयोगाचा दौरा ठरला वादग्रस्त .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणुन घेण्या करिता राष्ट्रीय सफाई आयोग विभागाच्या सदस्यानी शहराचा दौरा केला आहे . परंतु या दौऱ्यात फक्त  प्रशासकिय अधिकारी याना सोबत घेवुन आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या नेत्याना डावलुन आयुक्तानी बैठक घेतल्याने हा दौरा वादग्रस्त ठरला आहे .

उल्हासनगर महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणुन घेण्या करिता राष्ट्रीय सफाई कामगार आयोग विभागाचे सदस्य सचिव नरेंद्रदास आणि सल्लागार पुरणसिंग यानी  महापालिकेला भेट दिली . या भेटीच्या दरम्यान घेण्यात आलेल्या बैठकीत आयुक्त डॉ . राजा दयानिधी . सहायक पोलिस  आयुक्त डी.  डी.  टेळे . प्रांताधिकारी जयराज कारभाऱी,तहसीलदार विजय वाकोडे  हे उपस्थित होते. मात्र या बैठकीत सफाई कर्मचाऱ्याना न बोलवता परस्पर बैठक घेतली असा आरोप अखिल भारतीय सफाई मजदुर कॉंग्रेस चे राष्ट्रिय अध्यक्ष चरणसिंग टाक यानी केला आहे . ते आरोप करताना म्हणाले की या दौऱ्या दरम्यान आयोगाच्या सदस्यानी पहाटे पाच वाजे पासुन शहरातील हाताने किंवा डोक्यावर मैला वाहुन नेंतानाची परिस्थिती बघायला पाहिजे होती.त्यांचे आरोग्य,निवारा पदोन्नती,भरती प्रक्रिया यांचे निरीक्षण करणे गरजेचे होते.मात्र आयुक्त डॉ राजा दयानिधी यानी आम्हाला विचारात न घेता  १० ते १५ मिनिटात बैठक उरकुन घेतली त्यामुळे आम्ही आयुक्तांचा जाहीर निषेध करतो असा आरोप चरणसिंग टाक यानी केला आहे .

संबंधित पोस्ट