
उल्हासनगर महापालिकेचा अर्थ संकल्प लवकरच होणार सादर,काही शहर हिताच्या तरतुदीची मागणी
- by Rameshwar Gawai
- Feb 07, 2021
- 717 views
उल्हासनगर(प्रतिनिधी): उल्हासनगर महापालिकेचा वार्षिक अर्थ संकल्प लवकरच सादर होण्याची शक्यता असल्याने या अर्थ संकल्पात शहर हिताच्या करिता निधीची तरतुद करण्याची मागणी येथिल नागरिकानी केली आहे .
उल्हासनगर महापालिकेने आगामी अर्थ संकल्पात शहर हिता करिता अनेक तरतुदी करणे गरजेचे आहे शहरातील धोकादायक इमारती करिता आरक्षित असलेला एक कोटीचा निधी हा कमी असुन तो निधी दहा कोटी करन्यात यावा .तर धोकादायक इमारती मधिल रहिवाशा करिता ट्रांझिट कॅंप उभारण्यात यावा तर उल्हासनदीत ज्या दोन नाल्यांचे सांड पाणी सोडण्यात येते त्या खेमानी नाल्याचे व म्हारळ नाल्याचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा . तर खेमानी नाल्यावरील पंपिंग स्टेशन तुटल्याने त्या नाल्यावर पुन्हा तांत्रीक जाळ्या लावण्यात यावी .
वालधुनी नदीच्या सवर्धना करिता व स्वच्छता अभियाना करिता अर्थ संकल्पामध्ये निधी वाढवण्यात यावा दरम्यान शहरातील चार ही स्मशानभुमीत लाकडे मोफत देण्यात येतात मात्र स्मशानभुमीचे ट्रस्टी हे लाकडे मोफत देण्या बाबत विचार करत नाहीत . त्यावर महापालिकेने अर्थ संकल्पात तरतुद करुन चार ही स्मशानभुमी महापालिकेने ताब्यात घेवुन त्या मध्ये कर्मचाऱ्यांची नेमणुक करावी,दरम्यान डंपिंग ग्राऊंड मधुन निघणारा विषारी धुर याचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा . शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत . त्या करिता अतिरिक्त निधी मंजुर करुन रस्त्यावरील खड्डे व रस्ते चकचकीत करावीत .
उल्हासनगर शहरा करिता स्वतंत्र जल शुध्दीकरण केंद्र उभारुन वितरण व्यवस्था योग्य प्रकारे झाली पाहिजे अशी व्यवस्था करावी .घनकचरा व्यवस्थापन व्यापक करुन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात करिता अर्थ संकल्पात विशेष निधीची तरतुद करण्यात यावी महापालिकेची अधांतरी लटकलेली रेग्युलायझेशन प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरु करण्यात यावी .तर महापालिकेचा प्रत्येक विभाग हा संगणकिय प्रणाली ने जोडण्यात यावा या करिताही अर्थ संकल्पात तरतुद करण्यात यावी .
शहरातील जल वाहिन्या या बऱ्याच ठिकाणी तुटल्या आहेत त्या जल वाहिन्याची दुरुस्ती करन्या करिता अर्थ संकल्पात तरतुद असायला हवी .उल्हासनगर महापालिकेची परिवहन सेवा पुन्हा सुरु करण्या करिता १६ बसेस खरेदी करण्यासाठी गेल्या अर्थ संकल्पात ३ कोटी ५५ लाख रुपये मंजुर केले होते . तेव्हा त्या निधीत वाढ करुन नागरिकांच्या हिता करिता परिवहन बस सेवा सुरु करावी .तर गेल्या अर्थ संकल्पात महापालिकेने १०० बेड चे रुग्णालय उभारण्या करिता तरतुद केली होती परंतु त्या बाबत महापालिकेने कोणते ही पाऊल उचलले नाही व सत्ताधाऱ्याची रुग्णालय बनवण्याची घोषणा हवेतच विरुन गेली . दरम्यान अशा विविध योजना राबवण्या करिता महापालिकेने आगामी अर्थ संकल्पात विशेष निधींचा सामावेश करुन शहर हिताचे काम करावे अशी मागणी शहरवासी करत आहेत .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम