
वीज खंडीत करा,नाही तर बेमुदत उपोषण .
- by Rameshwar Gawai
- Feb 05, 2021
- 1284 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : अंबरनाथ येथिल एम आय डी सी मधिल ७०केमिकल कंपन्याचा वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडीत करन्याची मागणी समाजसेवक शिवाजी रगडे यानी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला केली आहे . कारण ह्याच केमिकल कंपन्या वालधुनी नदीत घातक केमिकल टाकुन नदी काठावरील नागरिकांच्या जिवीताशी खेळत आहे तेव्हा या कंपन्यांची वीज व पाणी जोडण्या तोडल्या तर त्याना चांगलाच धक्का बसेल . जर यांच्या दोन्ही जोडण्या तोडल्या नाही तर २२ फेबृवारी पासुन एम आय डी सी कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा समाजसेवक शिवाजी रगडे यानी दिला आहे .
अंबरनाथ पश्चिमच्या वडोलगांव ग्रामस्थ आणि सम्राट अशोकनगर चे रहिवासी हे वालधुनी नदी च्या काठावर राहतात . त्याना या केमिकल कंपनीच्या उग्र वासा मुळे दररोज त्रास सहन करावा लागत आहे . तर या एम आय डी सी मधिल ७० केमिकल कंपन्या कडे केमिकल वर प्रक्रिया करन्याचे कोणते ही प्लॉंट नाहीत त्यामुळे सदर कंपन्या आपले वेस्टेज केमिकल वालधुनी नदीत सोडतात . मात्र त्या केमिकल च्या उग्र वासाने नागरिकाना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे . दरम्यान अंबरनाथ एमआयडीसी पुर्व व पश्चिम च्या हद्दीत असलेल्या ७० केमिकल कंपन्याना गेल्या २ महीन्या पुर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रेड ज़ोन नोटीस दिल्या होत्या तर सोबतच अंबरनाथ बदलापुर नगरपालिकेला व सी ई टी पी याना सुध्दा नोटीस बजावल्या होत्या . दरम्यान दोन वर्षापुर्वी उल्हासनगर येथिल ५५० जिन्स वॉश कंपन्यांचे पाणी व वीज जोडण्या खंडीत केल्या आहेत .
२ फेबृवारी रोजी रात्रीच्या वेळी केमिकल सोडन्यात आले तेव्हा हे केमिकल कुठून आले याचा तपास केला असता या कंपन्याना नोटीसी बजावुन देखिल बिनधास्त पणे केमिकल सोडतात ही माहीती मिळाली त्यामुळे या सर्व केमिकल कंपन्यांचे पाणी व वीज जोडन्या तुरंत खंडीत करुन त्यांच्यावर बंदी घालावी अशी मागणी समाजसेवक शिवाजी रगडे यानी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळा कडे केली आहे . जर या कंपन्यावर कारवाई झाली नाही तर २२ फेबृवारी पासुन एम आय डी सी कार्यालया समोर बेमुदत उपोषण करन्यात येणार असल्याचा इशारा रगडे यानी दिला आहे . यावेळी वालधुनी बिरादरीचे सुधाकर झोरे व शशिकांत दायमा हे उपस्थित होते .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम