उल्हास नदीला सर्वदूर पर्यंत जलपर्णीचा वेढा,लाखों नागरिकांचे जीवन धोक्यात .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : कर्जतच्या कातळदरा भागात उगम पावलेल्या उल्हास नदीचा सुरुवातीचा प्रवास हा पावसाळ्या पुरता पाणी वाहून नेणारा असतो. पुढे टाटा धरणाच्या पाण्याचा प्रवाह पेज नदीतून उल्हास नदीत सामील होतो. उल्हास नदी तेथून बारमाही वाहणारी होती आणि पुढे उल्हास नदीचे पाणी उल्हासनगर मार्गे  कल्याण खाडीला जाऊन मिळेपर्यंत बदलापूर येथे ते सर्व पाणी अडवून शहरी भागाला पिण्यासाठी दिले जाते. अशा या महत्वाच्या नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. कारण कर्जत आणि नेरळ या शहरी भागाचे सांडपाणी या बारमाही वाहत्या नदीत वाहून येत आहे . त्या सांडपाण्यामुळे उल्हास नदीचे पाणी प्रदुषित झाले असून, त्यात जलपर्णीची ही  वाढ झाली आहे. 

अनेकदा जलपर्णी काढण्याचे काम कर्जत परिसरात हाती घेण्यात आले. परंतु, काढलेली जलपर्णी नदी पात्राच्या बाहेर न टाकता नदीपात्रातच परत टाकली जात असल्याने ही जलपर्णी नेरळ, शेलू, वांगणी परिसरात पाण्याच्या प्रवाहात वाहून येते त्यामुळे  नदी पत्रातील पाणी दूषित झाले आहे. कर्जत शहरात नागरी वस्तीतली सांडपाणी वाहून नेणारी गटारे ही उल्हास नदीमध्ये सोडली आहेत. यावरही उपाययोजना आवश्यक आहे. 

त्याच सोबत, नेरल, बदलापुर, वरप, म्हारल येथील नाले सुद्धा उल्हास नदी मध्ये प्रदूषण पसरवत आहेत.नदीचे पाणी केवळ गढूळ बनले नाही तर त्या पाण्याला चिकटपणा देखील आला असून वाहत्या नदीमध्ये पोहण्याची मजा घेणार्‍यांच्या शरीरावर खाज सुटते आहे. त्यामुळे नदीमध्ये पोहायला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. नदी मध्ये वाढत्या जलपर्णी मुळे ऑक्सीजन न मिळाल्या ने मासे व समुद्री जलजीव सुद्धा मरण पावत असल्याने ह्या आधी आपण पाहिले आहे, मात्र ही समस्या केवळ कर्जत शहरात सांडपाणी उल्हास नदीमध्ये सोडल्यामुळे निर्माण झालेली नाही. तर गेल्या काही वर्षात सातत्याने नागरीकरण झालेल्या नेरळ शहर वजा गावातून असलेल्या रहिवाशी भागातील सांडपाणी देखील माथेरानच्या डोंगरातून पावसाळ्यात पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात सोडले आहे.तो नाला नंतर नेरळ येथे उल्हास नदीला जाऊन मिळतो. त्यामुळे कर्जत नंतर उल्हास नदी मध्ये नदीचे पाणी प्रदूषित करणारे जलपर्णी यांचे उगम हे नेरळ गावातून देखील झाले आहे. ते सांडपाणी येथे उल्हासनदीमध्ये गेल्यानंतर जलपर्णी यांच्या संख्येने वाढ होते. ही समस्या केवळ कर्ज़त, नेरल, बदलापुर, वरप, म्हारल येथील सांडपाण्यामुळे निर्माण झाली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

संबंधित पोस्ट