बैलगाडीवर दुचाकी ठेऊन इंधन दरवाढीचा निषेध.

उल्हासनगर(प्रतिनिधी) : बैलगाडीवर दुचाकी ठेवून इंधन दरवाढीचा उल्हासनगर मध्ये शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यापासून ते पवई येथिल प्रांत कार्यालयापर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात आला.

उल्हासनगर प्रांत  कार्यालय पवई चौक उल्हासनगर ३,येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे ,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी,नगरसेवक धनंजय बोडारे, शिवसेना गटनेते रमेश चव्हाण,उपशहर प्रमुख राजेंद्र शाहु,युवासेना शहर प्रमुख बाळा श्रीखंडे उपस्थित होते.

या मोर्चात खुद्द  महापौर लिलाबाई आशान  आणि शिवसेना गटनेत्यांनी  बैलगाडी हाकली.शिवाय प्रांत कार्यालयासमोर काही वेळ ठिय्या आंदोलन केले.यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक सामील झाले होते. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत ही भाववाढ केंद्र सरकारकडून केली जात असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे असा आरोप शिवसेनेने केला. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी राज्य सरकारने इंधनावरील कर कमी करण्याचा सल्ला देत आहे.याचा देखील इथे निषेध करण्यात आला.  यावेळी पेट्रोल आणि डीझेलचे दर कमी करण्याच्या मागणी चे निवेदन प्रांताधिकाऱ्याना  देण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट