विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई,दोन सराईत अल्पवयीन दुचाकी चोरटे ताब्यात,मौज मस्ती साठी करायचे दुचाकी चोरी

उल्हासनगर(प्रतिनिधी) :गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगर परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या.दुचाकी चोरीचा दाखल गुन्ह्याचा तपास करताना विठ्ठलवाडी पोलिसांना उल्हासनगर-४ परिसरात स्मशानभुमी जवळील ब्राम्हण पाडा येथे एका संशयास्पद दुचाकीवर दोन मुलं बसले असल्याची माहिती बातमीदारांने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणाच्या अधिकाऱ्यांना कळवली.पोलीस उपनिरिक्षक हर्षल राजपुत यांनी त्याच्या पथकासह तत्काळ सापळा रचत दोन अल्पवयीन सराईत चोरट्याना ताब्यात घेतलं. या मुलांची चौकशी केली असता ही दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले.अधिक तपासादरम्यान या अल्पवयीन मुलांनी पाच दुचाक्या चोरल्या असून त्याच्या विरोधात उल्हासनगर मधील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.पोलिसानी या मुलांकडून चोरी केलेल्या  पाच दुचाकी जप्त केली आहे. मौजमस्तीसाठी मुलांनी दुचाकी चोरल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून चोरी करण्यामागे आणखी काही कारण आहे का,त्यांचा आणखी कुणी साथीदार आहे का याचा तपास विठ्ठलवाडी पोलिस करीत आहेत .

सदरची कारवाई परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत  मोहिते ह्यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक कन्नैया थोरात नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरणाचे पो.उप निरिक्षक हर्षल राजपुत,पो.नाईक जितेंद्र चित्ते,पांडुरंग पथवे,रोहिदास बुधवंत,राहुल काळे,पो.शिपाई वैजेनाथ राख,हरेश्वर चव्हाण समिर गायकवाड,गणेश डमाळे यांनी केले आहे.वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली नमुद गुन्हाचा पुढील तपास पोलीस नाईक पांडुरंग पथवे हे करित आहेत.

संबंधित पोस्ट