उल्हासनगर महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांना सोयीसुविधा पुरवण्याची मागणी.

उल्हासनगर(प्रतिनिधी): उल्हासनगर महानगरपालिकेची सुरक्षा व शिस्त अहोरात्र सांभाळणारे,महानगरपालिकेच्या शासन आणि प्रशासनाची जबाबदारी यशस्वीपणे पारपाडणारे महानगरपालिका प्रशासन आणि सुरक्षारक्षक महामंडळ नियुक्त सुरक्षारक्षकांच्याच सुरक्षा व सोयीसुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे.महानगरपालिकेत कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकांना सुरक्षा सोयीसुविधांचा अभाव असताना याकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करित असल्याने महानगरपालिका प्रशासनाकडून महाराष्ट्र सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१ अन्वयेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यचे दिसून येत आहे.

एकीकडे महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी तसेच शासनातील महापौर, उपमहापौर, गटनेते, विरोधी पक्षनेते यांच्या दालनावर लाखो रुपयांचा खर्च केला जात असताना दुसरीकडे मात्र महानगरपालिकेची सुरक्षा व्यवस्था चोखपणे सांभाळणाऱ्या  सुरक्षारक्षकांना गणवेश बदलण्यासाठी, जेवण करण्यासाठी एकही दालन उपलब्ध करून दिले जात नाही. महानगरपालिका तळमजल्यावर असलेली सुरक्षा कँबीन देखील धोकादायक स्थितीत आहे.

या उल्हासनगर महानगरपालिका शासन प्रशासनाच्या दुजाभावामुळे महानगर पालिकेतील सुरक्षारक्षकांचीच सुरक्षा व सोयीसुविधा अभावी परवड होताना दिसून येत असल्याने याबाबत  महानगरपालिका आयुक्त यांना एक निवेदन देत महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१ अन्वयेची अमलबजावणी करित उल्हासनगर महानगरपालिकेतील सुरक्षारक्षकांना तात्काळ सोयीसुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट