
येऊर, कासारवडवली, कोठारी कंपाऊंड भागातील,बेकायदा बार आणि ढाब्यांमुळे नागरिक त्रस्त
- by Reporter
- Feb 03, 2021
- 1207 views
ठाणे :येऊरचा निसर्गरम्य परिसर, घोडबंदरचा सर्व्हिस रोड आणि खाडी किनारा तसेच कोठारी कंपाऊंड परिसरातील हॉटेल्स, हुक्का पार्लर, लाऊंड आणि ऑर्केस्टा बारचे वाढते प्रमाण पाहता स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. याबाबत उत्पादनशुल्क विभाग, गृह विभाग आणि ठाणे महानगरपालिका यांनी संयुक्तिरित्या कारवाई करण्याची गरज आहे. ही आस्थापने शासकीय जमिनींवर अतिक्रमण करून झालेली आहेत. त्यांना अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र मिळू शकत नाही. उत्पादन शुल्क विभागदेखील अशा ठिकाणी मद्यविक्री करू देत नाही, तरीदेखील सर्रासपणे इथे ही मद्यविक्री होत आहे.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतानाच इथे अशाप्रकारे त्याचेही उल्लंघन होत आहे. आता तर बेकायदा हॉटेल्स, हुक्का बार उभारण्याची स्पर्धाच लागली आहे. येऊन परिसरात रात्री प्रवेशास सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानाही हे नियम पायदळी तुडवले जात आहेत. घोडबंदर परिसरातील शेतजमीन आणि वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण हे दिवसाढवळ्या झाले आहे. त्यामुळे याबाबत कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठाणे महानगरपालिकेची कुठलीही परवानगी नसतात घोडबंदर सर्व्हिस रोड आणिं खाडी किना-यालगतची सरकारी-खासगी आणि शेत जमीन येथे मनमानी पद्धतीने बांधकाम सुरु आहे. त्यातही लाईव्ह ऑर्केस्टा बार हा अद्याप शासनाने परवानगी दिली नसतानाही सुरु आहे.
येऊन आणिं उपवन भागात लाईट हाऊस, फ्लेवर्स, बॉम्बे डक, बॉम्बे ढाबा, निवांत हॉटेल, द व्हिलेज, जन्नत, द ब्रिक हाऊस, कासाररवडवली भागात खुशी आणि मैफिल लाईव्ह ऑर्केस्टा, जंगल ढाबा, बॅकयार्ड, मिराकी, पिंक बाबा, नाका, स्काय लाऊंज, ड्राईव्ह अवे, स्टार लाईट, वेलवेट आणि कोठारी कंपाऊंड मध्ये डान्सिंग बॉटल, एमच ०४, वेअर हाऊस, सोशल आणि के नाईट लाईव्ह ऑर्केस्टा असे बार आणि आस्थापने आहेत.
रिपोर्टर