
उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांचेवर सेवा अतंर्गत नियमान्वये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.
- by Rameshwar Gawai
- Feb 02, 2021
- 789 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : महाराष्ट्र नागरिक सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्ती ) नियम १९८१,नियम ३४ मधिल तरतुदी नुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा संपूर्ण वेळ हा शासनाच्या सेवेसाठी असतो.कार्यालयीन वेळे खेरिज अन्य वेळी तर काही वेळा सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम करणे बंधनकारक असते.मुख्यालयात राहणे व त्याला मुख्यालय सोडण्यापूर्वी पुर्वपरवानगी घेणे आवश्यक असते.तसेच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र नागरिक सेवा ( वर्तणूक ) नियम १९७९ तयार करण्यात आले असून वर्तणूक नियमांमधिल नियम क्र.३ मधिल तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने नेहमीच ( अ ) नितांत सचोटी राखावी, ( ब ) कर्तव्यपरायणता ठेवावी, आणि ( क ) शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय ठरेल अशी कोणतीही गोष्ट करू नये असे नियम असताना उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. दयानिधी राजा हे आपल्या शासकीय सेवेत हलगर्जीपणा दाखवत कर्तव्यात कसूर करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर सेवा अंतर्गत नियमांंन्वये कायदेशीर कारवाई करन्याची मागणी पत्रकार व समाजसेवक मनोज कोरडे प्रधान सचिव नगरविकास मंत्रालय याना केली आहे .
त्यानी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयात प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. कार्यालयीन दैनंदिन कामकाजावर तसेच अधिकारी कर्मचारी यांचे आस्थापना विषयक सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे.अशाप्रकारच्या मुख्यालयातील प्रशासकीय कामकाजा संबधिच्या आपल्या उपस्थितीबाबत दैनंदिन नोंदवहीत ( डेली डायरी ) नोंद ठेवणे.तसेच महानगरपालिका क्षेत्रातील अनेक विकासकामाच्या ठिकाणी पाहणीसाठी स्थळपाहणी दौरा करताना, प्रशासकीय कामानिमित्त बैठकी करिता मुख्यालयाच्या बाहेर जाताना फिरती कामकाजाच्या स्वरुपानुसार हालचाल नोंदणी ( मुव्हमेंट रजिस्टर ) ठेवणे हे आयुक्त महानगरपालिका यांना महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचे सेवाविषयक बाबी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ महाराष्ट्र शासन नियम/निर्णय/ परिपत्रके/अधिसूचनेनुसार शासकीय कार्यालयात दैनंदिन नोंंदवही व हालचाल रजिस्टर ठेवणे आवश्यक बाब असताना उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी हे दैनंदिन नोंदवही ( डेली डायरी ) व हालचाल नोंदणी ( मुव्हमेंट रजिस्टर ) मध्ये नोंदी करित नसल्याचे माहीती अधिकारात निदर्शनास आले आहे.
प्राप्त माहिती अधिकारातील माहिती नुसार उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त कार्यालयात दैनंदिन नोंदवही (डेली डायरी) आणि हालचाल नोंदणी ( मुव्हमेंट रजिस्टर ) नसल्याचीबाब उघड झाली आहे.याचा अर्थ उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त हे नियमितपणे आपल्या दैनंदिन शासकीय कामकाजाबाबत सेवाविषयक बाबींची पूर्तता करित नाहीत हे स्पष्ट होत असून त्यांची कार्यालयीन अनुपस्थित बाबत शंका निर्माण होऊन त्यांना वेतन कोणत्या आधारे देण्यात येते हा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.तरी महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचे सेवाविषयक बाबी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ महाराष्ट्र शासन नियम/निर्णय/ परिपत्रके/अधिसूचनेनुसार शासकीय कार्यालयात दैनंदिन नोंंदवही व हालचाल रजिस्टर ठेवणे आवश्यक बाब असताना सुध्दा
उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त हे दैनंदिन नोंदवहीत ( डेली डायरी ) तसेच हालचाल नोंदणी ( मुव्हमेंट रजिस्टर ) मध्ये आपल्या दैनंदिन कार्यालयीन उपस्थिती बाबतच्या नोंदी अद्ययावत ठेवत नसल्यामुळे त्यांचेवर महाराष्ट्र नागरिक सेवा ( वेतन ) नियम, १९८१ नुसार कारवाई करित त्यांचे मासिक वेतन त्वरित थांबवण्यात येऊन त्यांना घरभाडे भत्ता प्राप्त होत असल्याने त्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी निवास करणे बंधनकारक असताना ते मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने त्यांचेवर सेवा अंतर्गत नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी प्रधान सचिव, नगरविकास विभाग, मंत्रालय यांच्याकडे मनोज कोरडे यानी एका पत्रा द्वारे केली आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम