उपनिबंधक-सहकारी संस्था-वसई यांची फसवणूक,फसवणूक करणारे विधिज्ञ-मुख्य प्रवर्तक मोकाट

वसई (दीपक शिरवडकर) - खोटी कागदपत्रे सादर करून काही तथाकथित, उपेक्षित विधिज्ञ हौसिंग सोसायटया नोंद करत शासनाची तसेच सदनिकाधारकांची दिशाभूल व फसवणूक करीत आहेत. उपनिबंधक कार्यालयाकडे सादर होणारा दस्त  बनावट आहे हे माहित असूनही काही मुख्य प्रवर्तक व अतिउत्साही रहिवाशी अशा विधिज्ञांना हाताशी धरून हौसिंग सोसायटया नोंद करून रहिवाशांची,बँकाची विविध शासकीय आस्थापनांची,पंतप्रधान आवास अनुदान योजनेची,जिल्हा हौसिंग फेडरेशनची फसवणूक करीत मोकाटपणे वावरत आहेत.

तर उपनिबंधक,सहकारी संस्था, वसई कार्यालयाचा कारभार  बेभरवशाचा चालला असून प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराचा फटका सहकार विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे रहिवाशांना बसत आहे. उपनिबंधक कार्यालयाकडे हौसिंग सोसायटी नोंदणीकरता ट्रान्सफरर-ट्रान्सफरी-कन्फर्मिंग पार्टी असा त्रिसदस्यीय करारनामा, इमारतीची सी सी/ओ सी/सात-बारा उतारे/डीड ऑफ डिक्लेरेशन,बिनशेती परवाना मोफा कायद्याच्या नियमातील नमुना ७ अर्ज/रचनाकार यांचा बांधकामाबाबतचा दाखला जागेचे कुलमुखत्यारपत्र/सक्षम अधिकाऱ्याने मंजूर केलेल्या बांधकामाचा नकाशा/जागा निर्वेध असल्याबाबतचा टायटल सर्च रिपोर्ट/जागा विकसित करण्यास घेतली असल्यास विकसन करारनामा/प्लॉट बिगरशेती केलेला सक्षम अधिकाऱ्याचा दाखला/प्लॉट खरेदीचा करारनामा,मालमत्ता पत्रक आदी कागदपत्रे सादर करावी लागतात अशी कागदपत्रे सादर झालेली नसताना,सादर झालेली कागदपत्रे खोटी असल्याचे माहीत होऊनही सन २०१३-२०१४ पासून उपनिबंधक,सहकारी संस्था वसई कार्यालय व जिल्हा उपनिबंधक ठाणे/पालघर कार्यालयाच्या संमतीने सोसायटयांची नोंदणी केली गेली आहे. खोटया व बोगस दस्ताने नोंद झालेल्या हौसिंग सोसायटयांची नोंदणी रद्द करण्या बाबत तक्रारदाराने तक्रारी केल्यास उपनिबंधक कार्यालयाकडून कागदपत्रे तपासण्याचे काम आमचे नाही. हौसिंग सोसायटीची नोंदणी रद्द करण्यासाठी विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था, कोकण विभाग, बेलापूर यांच्याकडे अपील करा असा सल्ला दिला जातो.व नाहकपणे सर्वसामान्यांची सतावणूक केली जाते. सहकारी संस्था विभागाकडून कागदी घोडे नाचवत बोगस नोंदित सोसायटयांना अभय दिले जाते.

कायदेशीर मालकी हक्क नसलेल्या, इमारतीचे बांधकामच अस्तित्वात नसताना,मासिक भाडेतत्त्वावरील पगडी पध्दतीने रहाणाऱ्या रहिवाशांच्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सभासदांची भाग रक्कम जमा नसताना बँक शिल्लकेचा दाखला नसताना, हौसिंग सोसायटया नोंद करून दिल्या आहेत;काही रहिवाशांची कोणतीही कागदपत्रे सादर झालेली नसताना अशानाही सोसायटीचे सभासदत्व दिले गेले आहे, तक्रारदारांचे अडचणीचे वाटणारे तक्रार अर्ज समाधानकारक खुलासा करता येत नसल्याने कार्यालयीन स्तरावरून निकाली काढले जातात.विभागीय सहनिबंधकाचे कार्यादेश दुर्लक्षीत केले जातात.अशा बोगस नोंदित सोसायटया सदनिकाधारकांची फसवणूक करीत बेकायदेशीररित्या सेवाशुल्क,ट्रान्सफर प्रिमियम, नॉन ऑक्युपन्सी चार्जेस, भागभांडवल रक्कम आदीची वसुली करतात,ना-हरकत प्रमाणपत्रे देत अपराधात्मक आर्थिक गुन्हे करीत आहेत.

खोटया दस्ताने नोंदित हौसिंग सोसायटयां कडून बँक ऑफ इंडिया,फेडरल बँक, आय-डीबीआय,टाटा कँपिटल, एडेलवीज आदित्य बिरला कँपिटल,इन्क्रेड फायनान्शियल फुलटॉर्न इंडिया बुल्स, दी ठाणे जिल्हा सहकारी बँक, पंजाब महाराष्ट्र बँक,  वांगव्हँली सहकारी पतपेढी,आवास योजना पतपेढी, एच.डी.एफ सी बँक, कॉसमॉस बँक, बेसिन कँथलिक तसेच गल्लीबोळातील काही को ऑप.बँका आदी वित्तीय संस्थांची फसवणूक झाली आहे, होत आहे.

वसई तालुक्यात सन २०१८ पर्यंत ६०२८ हौसिंग सोसायटया नोंद झाल्या आहेत बोगस,खोटया दस्ताने, बेकायदा बांधकामाच्या ठिकाणी नोंद असलेल्या सोसायटींची आकडेवारी प्रशासनास ज्ञात असूनही कळून सवरून कार्यवाही होत नाही. 

     

      

संबंधित पोस्ट