
उल्हासनगरात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट .
- by Rameshwar Gawai
- Jan 31, 2021
- 1363 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात सध्या अनधिकृत बांधकामाचा सुळसुळात झाला असुन महापालिका या बांधकामांवर कोणती ही कारवाई करत नसल्याने हे भुमाफिया फारच निर्ढावलेले आहेत.त्यामुळे आयुक्त डॉ. राजा दयानिधी अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर ,उपायुक्त मदन सोंडे हे सर्व महापालिकेचे जबाबदार वरिष्ठ अधिकारी या सर्व अनधिकृत धोकादायक बांधकामांना सर्वस्वी जबाबदार आहेत.
सहायक आयुक्त अजय एडके, खटूराणी अजित गोवारी व सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली आणि योग्य देखरेखीखाली ही सर्व अनधिकृत बांधकामे सर्वच प्रभाग समित्यां मध्ये अगदी बिनधास्त पद्धतीने सुरू आहेत तर हे बांधकाम व्यवसायीक झाडे तोडुन बांधकामे करत आहेत .
शहरातील सत्ताधारी पक्षातील काही नेते मंडळींचा या सर्व अनधिकृत बांधकामांना पाठिंबा असल्याने कायद्याचा कसलाच धाक या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भुमाफियाना राहिलेला नाही.महापालिकेची सार्वजनिक शौचालये,महापालिकेच्या रिकाम्या जागा सर्रासपणे हडप केल्या जात आहेत परंतु महापालिका प्रशासनाला या सर्वांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
या आंधळ्या आणि बहिऱ्या महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी,त्यांची कानउघडणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच आता कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यानी दिला आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम