
उल्हासनगर व अंबरनाथ येथिल वाढत्या प्रदुषणाची प्रधान सचिवा कडे तक्रार दाखल
- by Rameshwar Gawai
- Jan 29, 2021
- 1125 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यांनी उल्हासनगर व अंबरनाथच्या वाढत्या प्रदूषणा संदर्भात प्रधान सचिव पर्यावरण व वातावरणीय विभाग , महाराष्ट्र शासन सौ मनीषा म्हैसकर यांची भेट घेवुन त्याना प्रदुषणा बाबत निवेदन सादर केले आहे .
रोहित साळवे यांनी प्रधान सचिव सौ . मनिषा म्हैसकर यांची भेट घेऊन त्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की उल्हासनगर , अंबरनाथ येथिल वालधुनी नदी पात्रात वारंवार होत असणारे प्रदूषण , व कारखाने तसेच टँकर द्वारे रसायनाची अनधिकृत विल्हेवाट नदीपात्रात करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने नदी काठावर राहणाऱ्या नागरिकाना या घातक रसायनाचा फार त्रास होत आहे
नुकताच उल्हासनगर , अंबरनाथ शहरात व पाले गाव शिव मंदिर परिसर , कैलास कॉलनी , समतानगर . भरतनगर येथे वायु प्रदूषणा मुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होवुन श्वास घेन्यास वारंवार होणारा त्रास आणि डोळ्यात जळजळ होणे या प्रकाराने नागरिक रस्त्यावर आले होते . परंतु सुदैवाने त्या वेळेस कोणती ही जीवित हानी झाली नाही, दरम्यान मोठ्या प्रमाणात अजून ही कारखानदार , व जीन्स कारखानदार सर्रास पणे प्रदूषण नियम धाब्यावर बसवून काम करत आहेत .तर ते प्रदुषित रसायन वालधुनी नदीत सोडुन नदीला प्रदुषीत करत आहेत .
त्यामुळे या कारखानदारांवर शासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यानी प्रधास सचिवाना दिलेल्या निवेदनात केली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम