आदिवासी शेतकऱ्यांची उभे पीक नष्ट करणाऱ्या उल्हासनगरातील भुमाफियांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल .आरोपी अटकेच्या भितीने फरार.

उल्हासनगर (प्रतिनिधी) : आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या  पीकावर ट्रॅक्टर चालवुन पीक  नष्ट करणाऱ्या उल्हासनगरातील भुमाफियांवर टिटवाळा पोलिस ठाण्यात चार महिन्या नंतर ॲट्रोसिटीसह विविध कलमा नुसार गुन्हा दाखल झाला आहे . सदर गुन्हा दाखल होताच  भुमाफिया प्रकाश बुधरानी सह त्याचे साथीदार  फरार झाले आहेत   

उल्हासनगर जवळ असलेल्या वरप गांवातील वाघेरपाडा येथिल आदिवासीच्या जमीनी बोगस शेतकरी असल्याचे दाखले देवुन जमीनी हडप केल्या आहेत . दरम्यान आदिवासी शेतकरी सुरेश सोमा हिंदोले . सावळाराम काथोड व  पुजारी काथोड यानी शेतात पीकाची लावणी केली होती . तेव्हा उल्हासनगरातील भुमाफिया प्रकाश बुधरानी व त्याच्या साथीदारानी यांच्या शेतातील पीक २५ व २६ ऑक्टोंबर २०२० रोजी च्या रात्री ट्रॅक्टर  लावुन उभे पीक नष्ट केले . दरम्यान या तीन ही आदिवासी शेतकऱ्यानी टिटवाला  पोलिस ठाण्यात   प्रकाश बुधरानी  व त्याचे अन्य साथीदार यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली होती . परंतु पोलिस यांच्या तक्रारीची दखल घेत नव्हते . अखेर  परिहित चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता व विश्व मानव कल्याण या संस्थेचे अध्यक्ष रामजी माहेश्वरी संजोट यानी शासन दरबारी   या प्रकरणाचा पाठपुरावा केला . दरम्यान टिटवाळा पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यानी तक्रार करायला गेलेल्या आदिवासी शेतकऱ्याना हाकलुन दिले होते . तर वरिष्ठाच्या आदेशाने अखेर टिटवाळा पोलिस ठाण्यात उल्हासनगर येथिल भुमाफिया प्रकाश बुधरानी व त्याचे साथीदार यांच्यावर  कलम  ४४७ . ,४२७ , आणि   ॲट्रोसिटी ॲक्ट  कलम  ३ (१ )(एफ),३ (१ )(जी),३ (२ )(अ)  नुसार गुन्हा दाखल झाला आहे .  खोटे शेतकऱ्यांचे दाखले देवुन आदिवासींच्या जमीनी हडप करणाऱ्या या भुमाफियांवर गुन्हे दाखल झाल्याने हे भुमाफिया अटकेच्या भितीने फरार झाले आहेत . मात्र त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे . दरम्यान सदर गुन्हे दाखल झाल्याने आता शेतकऱ्याना न्याय मिळणार आहे .

आदिवासी शेतकरी सुरेश सोमा हिंदोले सावळाराम काथोड व  पुजारी काथोड यांच्या तक्रारीवरुन प्रकाश बुधरानी व त्याच्या साथीदारांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तर या पुर्वी सुध्दा दोन ॲट्रोसिटीचे गुन्हे या भुमाफियांवर दाखल आहेत . परंतु अद्याप पर्यंत त्याना अटक झाली नाही . मात्र परिहित चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी राज्य शासना कडे  दाद  मागुन या गरीब आदिवासी शेतकऱ्याना न्याय देवुन त्यांचे  उभे  पीक  नष्ट  केल्याने  त्याना ताब्डतोब नुकसान भरपाई देन्यात यावी अशी मागणी केली आहे दरम्यान प्रकाश बुधरानी व त्याच्या साथीदारांवर हा ॲट्रोसिटीचा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे . तरी पण त्याना अजुन पर्यंत अटक केली नाही . दरम्यान या आरोपीना ताबडतोब अटक करुन गरीब आदिवासी शेतकऱ्याना न्याय देवुन नुकसान भरपाई देन्यात यावी अशी मागणी  विशालकुमार गुप्ता यानी शासना कडे केली आहे . तर टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजु वंजारी याना या गुंह्या बाबत विचारले असता ते  म्हणाले की आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करन्यात आला असुन पुढील तपास करुन लवकरच आरोपीना अटक करन्यात येईल असे सांगितले आहे .

संबंधित पोस्ट