
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीत अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश .
- by Rameshwar Gawai
- Jan 28, 2021
- 580 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड डॉ.सुरेश माने यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात २० जानेवारी पासून ते ७ मार्च पर्यंत जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर ५० दिवसांची जन संघर्ष यात्रा सुरू झाली आहे.हा डॉ.सुरेश माने यांचा झंजावात पाहून त्यांचा कार्याला सलाम म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे उल्हासनगर शहर अध्यक्ष हरेश ब्राम्हणे यांच्या उपस्थितीत अनेक महिलां व युवकांनी पक्ष प्रवेश केला आहे .या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला पक्षाचे युवा अध्यक्ष अविनाश नाईक, महासचिव भिका खैरनार, उपाध्यक्ष विश्वास पवार, सचिव आधार निकम आणि बी आर एस पी वकील आघाडीचे अध्यक्ष ॲड राजेश कोळी तसेच अक्षय सोनवणे, अनिल वाणी उपस्थित होते. दरम्यान सौ लताताई सोनावणे, उषाताई बागुल, सरिताताई गायकवाड, बेबीताई सोनवणे, संगीताताई ढिवरे, आशाताई सोनावणे, सोनल सपकाळे, मयुर निकम ही पक्ष प्रवेश केलेल्यांची नावे आहेत .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम