उर्जामंत्री डॉ .नितीन राऊत यांच्यावर कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करा - मनसे ची मागणी .

उल्हासनगर(प्रतिनिधी): कोरोना  संसर्ग काळात सर्वसामान्य नागरिकांना महावितरणने वाढीव वीजबिले  पाठविले होते.हे वीजबिले  कमी करुन  नागरिकांना दिलासा देऊ असे  आश्वासन आघाडी सरकार मधील उर्जामंञी डॉ . नितिन राऊत यांनी नागरिकांना दिले होते.त्यानंतर त्यांनी हे वीजबिले  दिवाळी नंतर माफ करण्यात येईल असे  ही आश्वासन नागरिकांना दिले  होते . मात्र नंतर उर्जामंञ्यांनी आपल्या वक्तव्या वरुन युटर्न घेतला आहेआपल्या आश्वासनाची आघाडी सरकार कडून पुर्तता होत नाही हे लक्षात आल्यावर डॉ .नितिन राऊत यांनी आपल्या भुमिकेत बदल केला.आता तर महावितरण ने वीजबिले भरले नाही तर वीज कापण्याचा  इशाराच दिला आहे .सरकारचा हा निर्णय तुघलकी असून सरकार ने भानावर येऊन ज्या जनतेने आपल्याला सेवेची संधी दिली मंत्री  बनवल त्या जनतेच्या भल्याचे निर्णय घ्यावेत व उर्जामंत्री  नितिन राऊत यांनी खोटी आश्वासने देऊन सामान्य नागरिकांची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम ४२० अतंर्गत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेच्या वतीने पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते, साहायक  पोलिस आयुक्त डी डी टेळे यांच्यासह चारही पोलिस स्टेशनला निवेदना द्वारे केली आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन कदम उपजिल्हा संजय घुगे, उपजिल्हा अध्यक्ष प्रदिप गोडसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख, मनविसेचे  शहरअध्यक्ष  मनोज शेलार शहर सचिव शालिग्राम सोनवणे शहर सहसचिव प्रा प्रविण माळवे,उपशहर अध्यक्ष मुकेश सेठपलानी,सुभाष हटकर, शहर संघटक दिनेश आहुजा, विभाग अध्यक्ष सुहास बनसोडे,अनिल गोधडे,प्रमोद पालकर,अक्षय धोत्रे,उपविभाग अध्यक्ष देवा तायडे,मुकेश चव्हाण,शाखा अध्यक्ष सुधिर सावंत,संजय नार्वेकर,प्रकाश कारंडे,मनविसे चे अशोक गरड,सचिन चौधरी,तन्मेश देशमुख,उपस्थित होते .

संबंधित पोस्ट