
उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रोहित साळवे यानी आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या समोर मागण्या मांडुन घेतली कार्यशाळा .
- by Rameshwar Gawai
- Jan 27, 2021
- 1362 views
उल्हासनगर(प्रतिनिधी): उल्हासनगर महापालिकेने मालमत्ताधारकांना स्वतःची मालमत्ता भाडे तत्वावर दिल्यावर त्याना ७३.५ हा जो कर त्यांना लावण्यात आलेला आहे. सदर कर हा अन्यायकारक असून तो रद्द करण्यात यावा तसेच महापालिकेच्या कर विभागात होत असलेला सावळा गोंधळ व भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष रोहित साळवे यानी शिष्टमंडळासह आयुक्त डॉ . राजा दयानिधी याना भेटुन अनेक समस्या त्यांच्या समोर मांडुन एक प्रकारे त्यांची कार्यशाळाच घेतली .
उल्हासनगर महापालिकेच्या कर विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे . तर शहरात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक बंदी झाल्यावर सुद्धा दुकानदार कारखानदार अनधिकृतरित्या प्रतिबंधक प्लास्टिक बॅगचे उत्पादन व विक्री करत आहे अशा सर्व दुकानदार व कारखानदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करुन आयुक्तांचे चांगलेच कान टोचले आहेत .
दरम्यान गायकवाड पाडा उल्हासनगर ५ येथील डम्पिंग ग्राऊंड हस्तांतर करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन डंपिंग हटवन्यात यावे .
उल्हासनगर कॅंप ४ येथील स्मशानभूमीची नागरिक समस्या लक्षात घेता जी खाजगी ट्रस्ट या स्मशानभुमीची देखभाल करीत आहे त्या ट्रस्टकडून देखभाल काढून घेण्यात यावी आणि स्व:ता उल्हासनगर महापालिकेने स्मशानभुमी ताब्यात घेवुन देखभाल करावी.
तर गायकवाड पाडा उल्हासनगर ५ येथील नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी महावितरण मंडळाचे अवजड उपकरणे आणण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा तसेच उल्हासनगर. ४ या ठिकाणी प्रस्तावित स्विचींग स्टेशन साठी भूखंड उपलब्ध करून देण्यात यावा या मागण्या आयुक्त डॉ . दयानिधी यांच्या समोर ठेवल्या असुन या
सर्व मागण्यांवर संबंधित विभागीय अधिकारी यांच्यामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी या वेळेस दिले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम