सिंधू दर्शन यात्रे करीता भारतीय सिंधू सभा उल्हासनगर शाखेची जय्यंत तयारी
- by Rameshwar Gawai
- Jan 24, 2021
- 422 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : सिंधू नदीचे उगमस्थान लेह येथे असुन या ठिकाणी २४ वर्षांपासून ऐतिहासिक सिंंधुदर्शन यात्रेचा १९ जुन पासून प्रारंभ होत असतो . तेव्हा या निमित्ताने या ही वर्षी प्रथम सिंधू महाकुंभ मेळावा लेहमध्ये संपन्न होत आहे. उल्हासनगरातील सिंधी बांधवांना या मेळ्याव्यात सामिल होण्यासाठी भारतीय सिंधू सभा, उल्हासनगर शाखेच्या वतीने तिर्थयात्रेचे आयोजन करन्यात आले आहे.
सिंधी समाजाचे श्रध्दास्थानी असलेल्या कैलास मानस सरोवरा तुन वाहत आलेल्या सिंधु नदी हे भारतातील एक तिर्थस्थान असल्याने जगभरातील सिंधी बांधव यावेळी एकत्र येतात. या मेळाव्यात संतशिरोमणी बहिराणा महाराज यांचा पुजोत्सव व सिंधू नदीचे दर्शन करण्यासाठी २३ ते २७ जुन या दरम्यान माफक दरात उल्हासनगर शाखेच्या वतीने या सिंधूदर्शन यात्रेत हवाई तसेच महामार्ग प्रवासाने सामिल होण्यासाठी भाविकांनी ऑनलाईन व प्रत्यक्ष नोंदणी करण्याचे आवाहन भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष लधाराम नागवानी यांनी झुलेलाल ट्रस्टच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे . कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर शिर्केआणि झुलेलाल विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका जयश्री आहुजा यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी, संत लिलाराम, संत अरजनदास, आमदार कुमार आयलानी, भाजपा शहराध्यक्ष जमनु पुरस्वानी, भारतीय सिंधू सभा महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश हेमलानी, महासचिव व नगरसेवक महेश सुखरामाणी आदी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड दिपक वाटवानी यांनी केले आहे . या कार्यक्रमात दिनदर्शिकेचे प्रकाशन सुध्दा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम